नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ लिपिक टंकलेखन आणि कर सहाय्यक, या संवर्गाकरिता घेण्यात आलेली कौशल्य चाचणी परीक्षा आणि त्यानंतर परीक्षेचा निकालही वादात सापडला होता. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले होते. अखेर मंगळवारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबादने या याचिकेवरील आपला निर्णय दिला असून ‘एमपीएससी’ने सर्वसारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. ८१६ उमेदवारांची यादी असून यामध्ये तन्मय काटुले यांनी सर्वाधिक गुण घेतले आहेत.

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ साठी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. यामध्ये सात हजारांवर लिपिक पदे तर ४८६ पेक्षा अधिक कर सहाय्यक पदांसाठी संपूर्ण प्रक्रिया घेण्यात आली. आयोगामार्फत एप्रिल २०२३ मध्ये पूर्व परीक्षा तर विषयांकित पदांची मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आली. सदर परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी ४ ते १३ जुलै २०२४ या कालावधीत घेण्यात आली. सदर टंकलेखन कौशल्य चाचणीत उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर ३० सप्टेंबर, २०२४ रोजी जाहीर करण्यात आली होती. यानंतरद टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर ‘मॅट’ने निर्णय दिला असून आयोगानेही तात्काळ सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.

टंकलेखन कौशल्य चाचणीतही गोंधळ

पात्र उमेदवारांच्या टंकलेखन चाचणी परीक्षेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे उमेदवारांनी परीक्षा पद्धतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना जुने संगणक दिल्याचा आरोपही झाला. शेवटी उमेदवारांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एमपीएससी’चा आक्षेप काय होता?

‘एमपीएससी’ने यासंदर्भात सविस्तर पत्र काढले असून त्यानुसार, सदर टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आली. ही न्यायिक प्रकरणे विचारात घेता ‘लिपिक-टंकलेखक’ व कर सहायक या संवर्गाच्या अंतिम निकालाची कार्यवाही सद्यस्थितीत प्रलंबित आहे. यासंदर्भात न्यायाधिकरणाच्या न्यायनिर्णयानंतरच पुढील कार्यवाही करणे शक्य होईल असे कळवण्यात आले होते. अखेर मॅटने निर्णय देताच एमपीएससीने निकाल जाहीर केला आहे.