नागपूर जिल्ह्यातील कोंढाळीतील बाजारगाव येथील एका व्यक्तीच्या हत्याकांडाचा छडा लागला. जावयाच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून सासूनेच जावयाचा खून करीत मृतदेह झाडाझुडूपात फेकून दिला. अलका ज्ञानेश्वर बोरसरे (५८, रा. बाजारगाव) असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा- ‘मार्ड’च्या संपाने यवतमाळात रुग्णसेवा कोलमडली

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २८ डिसेंबरला कोंढाळीजवळील बाजारगाव येथील बासबनात भारत आनंदराव वरवाडे (३७, रा. शिंदेवाही, जि.चंद्रपूर) या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. त्याच्या डोक्यावर दगडाने हल्ला केल्याच्या खुणा होत्या. पत्ते खेळण्याच्या भांडणातून किंवा घरगुती वादातून हत्या झाली, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. काही संशयितांना ताब्यात घेतले असता काहीही सुगावा सापडत नव्हता. शेवटी पोलिसांनी भारत वरवाडे यांच्या कुटुंबीयांची चौकशी करणे सुरू केले. त्यामध्ये सासू अलका बोरसरे यांच्यावर संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी सासूला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच तिने खून केल्याची कबुली दिली. आनंद हा पत्नीला नेहमी मारहाण करीत होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. तसेच त्याची सासूवरही वाईट नजर होती. हत्याकांडाच्या पहिल्या दिवशी सासू अलका आणि भारत यांच्यात भांडण झाले. त्याने सासूच्याही चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केली. त्यामुळे रागाच्या भरात सासूने जावयाच्या डोक्यात दगड घातला. यात गंभीर जखमी भारत हा सासूचा प्रतिकार करीत मारायला जात होता. त्यामुळे सासूने पुन्हा त्याच्या डोक्यावर दगड घालून त्याचा खून केला. त्याचा मृतदेह रात्रीच्या सुमारास बासबनातील झाडाझुडूपात फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा- नागपूर : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तरच्या ८९ जागांना कात्री?

पोलिसांनी घटनेचा छडा लावून आरोपी सासू अलकाला अटक केली. ही कारवाई नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल नागेश जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकाटे, राजीव कर्मलवार, कोंढाळीचे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी केली.