भंडारा : एका ३५ वर्षीय तरुणाने एका १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे वचन देत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थातिप केले. या संबंधातूनच मुलीला गर्भधारणा झाली. मात्र हे कळताच तरुणाने लग्नास नकार दिला.हा धक्कादायक प्रकार लाखनी तालुक्यातील पिंपळगाव/केसलवाडा वाघ येथे समोर आला आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी प्रदुम्न हरिचंद्र वर्थे (वय ३५) याला मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र मुलगी गर्भवती झाल्याचे कळताच त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. ही अल्पवयीन मुलगी ३७ आठवडे आणि ६ दिवसांची गर्भवती असून तिला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमांअंतर्गत आरोपी विरोधात कलम ६४(२)(१) आणि पोक्सोच्या कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलंगे करत आहेत.
लाखनीत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा संशय…
लाखनी तालुक्यातच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर मुलीच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला जात आहे. लाखनी येथील १६ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि शोध सुरू केला आहे.