वर्गमित्राने वाढदिवसाचे कारण सांगून घरी बोलावून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी सदर पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वैभव देवीदास देशपांडे (२६, रा. सांडरेळ, ता. चाकूर, जि. लातूर) असे आरोपीचे नाव असून तो मुळचा लातूरचा राहणारा आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव देशपांडे २०१६ मध्ये नागपुरात तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता व सदरमध्ये भाड्याने राहत होता. त्याची वर्गातील तरुणीशी मैत्री होती. सणासुदीला तरुणीचे कुटुंब वैभवला घरी जेवायला बोलावत असे. घटनेच्या दिवशी वैभवने वाढदिवसाचे निमित्त सांगून तरुणीला घरी बोलावले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. संतप्त तरुणीने पोलिसांकडे तक्रार करण्याची तयारी केली. पण वैभवने तिला लग्नाचे आमिष दाखवले. यासाठी तिच्या आईशी बोलणी करायला येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तरुणीने तक्रार केली नाही. ठरल्यानुसार वैभवने तरुणीच्या आईशी भेट घेऊन शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करण्याची तयारी दर्शवली. याला तरुणीचा भाऊ आणि आईने होकार दिला. त्यानंतर वैभव तिला नेहमीच घरी बोलावून शरीरसंबंध प्रस्थापित करीत होता. लग्न होणार असल्यामुळे तिचीसुद्धा सहमती होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वैभव देशपांडेला एका नामांकित कंपनीत व तरुणीला आयटी कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर तरुणीने लग्नासाठी आग्रह धरला. त्यासाठी लातूर गाठले. वैभवच्या आईवडिलांशी चर्चा केली. मात्र, वैभव आणि त्याचा पालकांनी लग्नास नकार दिला. तरुणीला शिवीगाळ करून परत पाठवले. त्यामुळे चिडलेल्या तरुणीने सदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात वैभवला अटक करण्यात येणार आहे.