नागपूर : मान्सूनच्या परतीचा अंतिम टप्पा सुरू असताना अरबी समुद्रात पुन्हा एकदा चक्रीय स्थिती तयार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हा पाऊस ‘ऑक्टोबर हीट’ पासून नागरिकांची सुटका करेल का, हे मात्र निश्चित नाही.

१३ ते १४ ऑक्टोबरदरम्यान अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार होण्याची शक्यता असून त्याचा प्रभाव हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान आदी राज्यांवर होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता असून काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यासह महाराष्ट्रात १४ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून हवामान बदलण्यास सुरुवात होईल. शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण राहील. तर १५ आणि १६ ऑक्टोबरला शहरात हलका ते मुसळधार पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर भागातही पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा : धक्कादायक! अंगझडती घेतली असता आढळली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे देखील राज्यात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडू शकतो. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये हलका पाऊस पडू शकतो, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.