नागपूर : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होत असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे राजकीय वारे वेगाने वाहात असतानाच राज्याच्या उपराजधानीची हवेची गुणवत्ता मात्र पूर्णपणे ढासळली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे नागपूरकरांना आता जपूनच श्वास घ्यावा लागणार आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी जाहीर केलेल्या हवा गुणवत्ता यादीत महाराष्ट्राची उपराजधानी हवेच्या बाबतीत चक्क दूषित आढळली. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नागपूरची हवा गुरुवारी अत्यंत वाईट होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर गुरुवारी राज्यातील शहरांची हवा गुणवत्ता पातळीची आकडेवारी दर्शविण्यात आली.

हेही वाचा – मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेला अटकपूर्व जामीन…

या आकडेवारीनुसार नागपूर शहराची हवा गुणवत्ता “वाईट” या वर्गवारीत मोजली गेली. शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक तब्बल २७२ इतका नोंदवण्यात आला. नागपूर शहराच्या तुलनेत मुंबई, पुणे, नाशिक या शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा कमी होत. त्यामुळे हवा गुणवत्तेच्या बाबतीत या शहरांची नोंद “मध्यम” या वर्गवारीत होती. त्यामुळे नागपूरपेक्षा हवा गुणवत्तेत ही शहरे चांगल्या स्थितीत होती. गुरुवारी सायंकाळी सात वाजता हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या रामनगर केंद्रावर सर्वाधिक हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला. तब्बल २७२ इतक्या हवा गुणवत्ता निर्देशांकाची याठिकाणी नोंद झाली. त्यापाठोपाठ सिव्हिल लाईन येथील केंद्रावर २४२ इतका हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला.

Vidarbha Assembly Election Results 2024 Live Updates: विदर्भात लोकसभा निकालाची पुनरावृत्ती होणार की चित्र बदलणार?

महालमधील केंद्रावर २३८ इतक्या हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद करण्यात आली. तर अंबाझरीतील केंद्रावर २०२ इतका हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला. दिवाळीत यावर्षी मोठ्या प्रमाणात फटाके फुटले, मात्र त्यावेळी देखील हवेची गुणवत्ता पातळी इतकी खालावलेली नव्हती. मात्र, दिवाळी संपून अनेक दिवस लोटल्यानंतर शहरातील हवेची गुणवत्ता पातळी इतकी खालावल्याने हे शहर दिल्लीच्या वाटेवर तर नाही ना, अशीही भीती आता व्यक्त केली जात आहे. हिवाळ्यात साधारणपणे हवेची गुणवत्ता पातळी खालावत असली तरी शहरात इतकी पण थंडी नाही. त्यामुळेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीने विचार करायला भाग पाडले आहे.

हेही वाचा – प्रदूषण कराल तर खबरदार! वीज केंद्राला बँक गॅरंटी जप्ती व संच बंदची नोटीस…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील हवेची गुणवत्ता पातळी “वाईट” या वर्गवारीत येत असेल तर तो या शहरातील लोकांसाठी धोक्याचा इशारा आहे. नागरिकांनी आता योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. विशेषकरून लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती आणि श्वासनासंबंधी आजार असलेल्या लोकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.