नागपूर : शहरात सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते झालेतरी अजूनही बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणात खड्डे आहे. महापालिका हे खड्डे बुजवण्यात चालढकल करत असल्याने यंदा गणपती बाप्पाचे आगमन खुड्ड्यातून करावे लागणार आहे.गणेशोत्सवाची सर्वत्र लगबग सुरू असताना बाप्पांचे आगमन ज्या रस्त्यावरून होणार आहे तेथेच खड्डे पडले आहे. शहरातील काही मुख्य रस्त्यावर आणि अंतर्गंत रस्त्यावर खड्डेच खड्डे आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने भाविकांना यातूनच मार्ग काढावा लागणार आहे.
गेल्या आठ ते दहा वर्षांपासून शहरात सिमेंट रस्ते तयार करण्यात येत आहे. या रस्त्यांना काही महिन्यात तडे गेले आहेत. तर काही रस्त्यांची कॉक्रीट बाहेर पडून खड्डे झाले आहेत. अनेक वस्त्यांमधील अंतर्गंत रस्ते अजूनही सिमेंट कॉक्रीटची व्हायची आहे. त्या रस्त्यांची अवस्था बिकट आहे. गेल्या दोन वर्षांपासून डांबरीकरण झालेले नाही. तसेच मलनिस्सारण आणि जलवाहिन्यांच्या कामासाठी रस्ते खोदून थातूरमातूर बुजवण्यात आले आहे. परिणामी जूनपासून झालेल्या जोरदार पावसामुळे या रस्त्यावर छोटे-छोटे खड्डे पडले. रस्त्यावर पडलेले खड्डे भरुन घेण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. काही रस्त्यांचे कामे अर्धवट आहे. काही रस्त्यांवरील डांबर वाहून गेला आहे. तर काही रस्त्यांचे गिट्टी बाहेर आल्याने दुचाकी घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका भाविक आणि कार्यकर्त्यांना बसत आहे.
शहरातील चौरसिया चौक, मोहनगर, मानकापूर रिंग रोड, जाफरनगरजवळ, मनीषनगर, फर्निचरच्या दुकानासमोर गट्टू निघाले मोठा खड्डा पडला आहे. तर मनीषनगर अजित बेकरीसमोर चक्क सिमेंट रस्त्याला खड्डा पडला आहे. मारुती अपार्टमेंट, न्यू काटोल रोड, आकारनगरजवळ, सुरेंद्रनगरनगर, विवेकानंदनगर, काटोल रोड, बैरामजी टाऊन, (गट्टू निघाले, खड्डे), लाल जयराम मार्ग, सेंट जोफेफ कॉन्व्हेंट मागे, चिंचभुवन मधील अंतर्गंत रस्ते, (अमृत योजनेत मलवाहिन्या टाकताना खोदलेले रस्ते), याशिवाय सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्याने आधीच्या डांबर रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. तर काही डांबरी रस्त्यांवर मोठी खड्डे झाले आहे.
शताब्दी चौक ते रामटेकेनगर दरम्यान सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. अर्धा रस्ता तयार झाला आहे. उर्वरित ररस्ता डांबरी आहे. त्यावर ठिकठिकाणी खड्डे आहे. एवढेच नव्हेतर मंगळवारी उड्डाणपूल आणि कळमना उड्डाणपुलावर खड्डे झाले आहे. बेसा चौकात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. स्वामी समर्थ मंदिराकडून मनीनषगरकडे जाताना मोठ्या खड्ड्यातून जावे लागले. त्यामुळे येथे दुचाकी चालकांचा अनेकदा तोल जाऊन अपघात होत आहे.