नागपूर : राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान घोटाळ्याचा गंभीर आरोप करत नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघाचे उदाहरन दिले होते. त्यानंतर कामठी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश भोयर यांनीही घोटाळ्याची पद्धत सांगत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यावर निवडणूक आयोगाएवजी आता भाजप नेत्यांनी खुलासा केल्याचा आरोप होत आहे.

काँग्रेससह महाविकास आघाडीचे कामठी मतदार संघाचे उमेदवार सुरेश भोयर यांनी पाच दिवसांपूर्वी पत्रपरिषदेत कामठी विधानसभा मतदारसंघात १५ दिवसांत १२ हजार मतदारांची नावे ऑनलाईन पद्धतीने केवळ आधार कार्डच्या जोरावर समाविष्ट करत इतर कागदपत्रे बघण्यात आली नसल्याचा आरोप केला होता. यावेळी भाजपच्या काही नेत्यांकडे निवडणूक आयोगाचे ऑनलाईन आयडी व पासवर्ड असल्याचाही आरोप केला गेला होता.

दरम्यान भोयर यांच्या आरोपात लोकसभा निवडणूकीनंतर कामठीत तब्बल ३५ हजार मतदारांची नोंद, अनेक गावातील नोंदवलेले मतदार प्रकत्यक्षात गावात नसल्यासह हे बोगस मतदान १०० टक्के झालेसह इतरही गंभीर आरोप केले होते. दरम्यान निवडणूक आयोगाला कागदपत्र मागितल्यावर ते दिले जात नसून हा मोठा गैरप्रकार निवडणूक आयोगाच्या संमतीनेच झाल्याचाही आरोपही भोयर यांनी केला होता. तातडीने चौकशी करून ही बोगस नावे वगळावे, अन्यथा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकही बोगस मतदानाच्या जोरावर भाजप जिंकण्याची शक्यताही भोयर यांनी वर्तवली होती. त्यावर निवडणूक आयोगाकडून अद्याप एकही वाक्याचा खुलासा आला नाही. परंतु भाजपकडून निवडणूक आयोगाचे प्रवक्ते सदृष्य खुलासे दिले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे.

भाजपच्या नागपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शनिवारी प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदत घेतली. त्यात काँग्रेस पराभव पचवू शकत नसून मतदारांचा अपमान करत असल्याचा आरोप केला. निवडणूक पारदर्शी झाल्याचा दावा करत काँग्रेस उमेदवार सुरेश भोयर यांनी भाजपचे नाव घेतल्याने आम्हाला खुलासा करावा लागल्याचे सांगत निवडणूक आयोगाला खुलासा द्यायचा असल्यास त्यांनी द्यावा. त्याच्याशी आमचा संबंध नसल्याचा दावाही पत्रपरिषदेत केला गेला. याप्रसंगी भाजपचे रामटेक जिल्हा अध्यक्ष आनंदराव राऊत, काटोल जिल्हा अध्यक्ष मनोहरराव कुंभारे, माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, डॉ. राजीव पोद्दार आणि इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप नेत्यांचे म्हणणे काय?

काँग्रेसने निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपावर आम्हाला काहीही म्हणायचे नाही. ते आयोगाला सांगायचे असल्यास सांगू शकतो. परंतु या गैरप्रकारात भाजपवर आरोप केल्याने आम्हाला आमची बाजू मांजावी लागली. काँग्रेस नेते अद्यापही पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर येत नाही. त्यामुळे आता ते थेट मतदारांचाच या पद्धतीचे आरोप करून अपमान करत असल्याचे मनोहरराव कुंभारे, आनंदराव राऊत, सुधाकर कोहळे यांनी सांगितले.