नागपूर : महापालिकेचे अग्निशमन खात्याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. अनेकदा सूचना करूनही मे. नितीका फार्मा. स्पेशालिटीज प्रा.लि.ने अग्निशमन यंत्रणा न बसवल्याने अग्नितांडवात नऊ कामगार ठार झाले होते. परंतु, अग्निशमन विभागाने अग्निशमन कायद्यानुसार पोलिसात तक्रार न दिल्याने याप्रकरणी संबंधित कंपनीविरुद्ध नऊ वर्षानंतरही खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकलेला नसल्याची बाब समोर आली आहे.

वांजरा लेआऊट, प्लॉट क. ८५, पिवळी नदी, नागपूर, येथे २ डिसेंबर २०१६ रोजी कंपनीत रात्री १०.०१ वाजेदरम्यान भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ गाड्या पाठवण्यात आल्या होत्या. ही आग दुसऱ्या दिवशी (३ डिसेंबर २०१६) सकाळी ५ वाजता आटोक्यात आली. आगीत नऊ कामगारांचा मृत्यू झाला. महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त रवींद्र कुमरे, अग्निशमन अधिकारी आर.डी. उचके यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या होत्या. परंतु, या प्रकरणात अग्निशमन विभागाने तक्रार दाखल केली नाही.

महापालिकेने या कंपनीस अग्निशमन उपाययोजना संबंधात २० ऑक्टोबर २०१४ रोजी नोटीस बजावली होती. कंपनीत २७ ऑगस्ट २०१६ रोजी आग लागून काही प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर अग्निशमन विभागाद्वारे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक अधिनियम २००६ चे कलम ६ अंतर्गत या इमारतीचे निरीक्षण करून २० ऑक्टोबर २०१४ रोजी अग्निसुरक्षा उपाययोजनांची पूर्तता करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. कंपनीतर्फे २९ नोव्हेंबर २०१४ रोजी नोटीसचे उत्तर देण्यात आले व तीन महिन्यात अग्निशमन उपाययोजनांची पूर्तता करण्याचे नमूद केले.

या इमारतीला अग्निसुरक्षा उपाययोजना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना २००६ चे कलम ५ व ६ अंतर्गत तपासणी करून २४ नोव्हेंबर २०१६ रोजी ६० दिवसांच्या कालावधीत उपाययोजना पूर्ण करण्यास नोटीस पाठवण्यात आली होती. दोन नोटीसनंतर काहीच उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ (२००७ च्या महा. ३) नुसार संबंधित कंपनी विरुद्ध तक्रार करून हत्येचा गुन्हा दाखल होणे आवश्यक होते.

अग्निशमन खात्याने काहीच पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता टी.एच. नायडू यांनी महापालिका आयुक्तांकडे हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त चारठणकर यांच्याकडून प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्याची शिफारस करण्यात आली. परंतु अग्निशमन खाते तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे.

पोलिसांनी अग्निशमन विभागाला पत्र लिहिल्यानंतर एका घटनेसंदर्भात एक साधे पत्र अग्निशमन विभागाने दिले. पण, अग्निशमन कायद्यानुसार तक्रार केली नाही, असे नायडू यांनी सांगितले.

अग्निशमन कायद्यानुसार पोलिसांत तक्रार न करून संबंधित कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे तत्कालीन अग्निशमन अधिकाऱ्याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हायला हवी. तसेच नऊ कामगारांच्या मृत्यूसाठी जबाबदार कंपनीला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी टी.एच. नायडू यांची आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एफआयआर’ करण्यात आला होता. त्यासंदर्भातील सविस्तर अहवाल अतिरिक्त आयुक्तांना देण्यात येईल. – तुषार बाराहाते, मुख्य अग्निशमन अधिकारी.