नागपूर : प्रेयसीने बाहेर फिरायला येण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने तिला मारहाण केली. तसेच तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे छायाचित्र तिच्या आईला पाठवले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी युवकाला अटक केली. साहिल नितनवरे (१९) रा. डिफेन्स कॉलनी, वाडी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला १६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक साहिल बी.ए.च्या प्रथम वर्षाला शिकतो. वडिल शेती तर आई धुणीभांडी करते. रितू (काल्पनिक नाव) ही सध्या बी. कॉमच्या प्रथम वर्षाला आहे. साहिल आणि रितू दोघेही एकाच महाविद्यालयात आणि एकाच वर्गात आठवी ते बारावीपर्यंत सोबतच होते. तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. रितू दहावीत असताना तिला वाढदिवस असल्याचे खोटे सांगून घरी नेले. तेथे गेल्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. ती दहावीत असतानापासून तो तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. बारावीनंतर दोघेही वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत असले तरी त्यांची मैत्री कायम होती. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन रितूवर बळजबरीने अत्याचार केला. यातून तिला गर्भधारणा झाली. दरम्यान तिला न कळत त्याने अश्लील फोटो आणि चित्रफित तयार केली होती. दोन दिवसांपूर्वी त्या दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाताच त्याने तिच्या मोबाईलवरून रितूच्या आईला फोन करून धमकी दिली. तसेच तिचे ‘न्यूड फोटो’ आणि शारीरिक संबंधाचा व्हिडिओ पाठविला. रितू गर्भवती असल्याचे उघड झाले. तसेच त्याने रितूच्या आई वडिलांनाही धमकी दिली. भयभीत झालेल्या रितूने वाडी पोलीस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा नोंदविला आहे. सोमवारी त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने त्याला १६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा – आधुनिक युगातील एकलव्य, इकोइंग ग्रीन फेलोशिपचा मानकरी

हेही वाचा – बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे अकोल्यात पडसाद; हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील व्हिडिओ

साहिलला रितूसोबत लग्न करायचे नव्हते आणि तिचेही लग्न होऊ द्यायचे नव्हते. तिला ‘ब्लॅकमेल’ करण्यासाठी त्याने बेडरुममध्ये मोबाईल लावून ठेवला. शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोबाईलने व्हिडिओ काढण्यात आला. तोच व्हिडिओ आईवडिलांना पाठविण्याची धमकी तो वारंवार देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. प्रेयसीने बाहेर फिरायला येण्यास नकरा दिल्यामुळे त्याने तिचा अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर तसेच इंस्टाग्रामवरही टाकला.