नागपूर : शिंदे गटातील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांना नागपूर उच्च न्यायालयाने अतिक्रमण प्रकरणात नोटीस बजावली आहे. त्यामुळे खा. तुमाने यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काय आहे ते प्रकरण. जाणून घेऊया. नागपूरच्या वळणमार्गासाठी (रिंगरोड) अधिग्रहीत केलेल्या जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भातील हे प्रकरण आहे.

हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

यासंदर्भात न्यायालयात दाखल याचिकेनुसार खासदार कृपाल तुमाने यांच्या नातेवाईकांनी नागपुरातील रिंग रोडस्थित ओंकारनगर ते शताब्दी चौकादरम्यान सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले, यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या. नासुप्रने बांधकाम तोडण्याची नोटीस बजावली. त्यानंतर खा. तुमाने यांनी नासुप्रला पत्र लिहून जागेवरील अतिक्रमण नियमित करावे, अशी विनंती केली होती.

हेही वाचा : संघाला बेरोजगारीची चिंता वाटणे हेच भारत जोडो यात्रेचे यश ; योगेंद्र यादव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वारंवार तक्रारी, पण दखल नाही

याचिकाकर्त्यांनी अनेकदा प्रशासनाला तक्रारी केल्या. परंतु कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी नागपूर उच्च न्यायालयाने बुधवारी खा. तुमाने यांच्यासह नासुप्र, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) तसेच वर्षा मुकेश तुमाने, अमय अशोक उनोने यांना नोटीस बजावली. सर्व प्रतिवादींना उच्च न्यायालयाने चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.