नागपूर : बेरोजगारीची समस्या अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लिमांसह इतरही जाती-धर्मात आहे. परंतु, विविध निवड मंडळे मुस्लिमांच्या निवडीकडे दुर्लक्ष करतात, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे या मंडळातील सदस्यांच्या कामात सुधारणा गरजेची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

हेही वाचा >>> निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो मान्य करा!; शरद पवारांचे आवाहन

हेही वाचा >>> शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’साठी ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने: शरद पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाचा निर्णय…”

विदर्भ मुस्लिम इन्टल्युक्चूअल फोरमतर्फे हाॅटेल तुली इंटरनॅशनल येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. अझीझ खान, ॲड. फिरदोज मिर्झा, फोरमचे अध्यक्ष डॉ. शकील सत्तार, राजा बैग, डॉ. आरीफ खान, परवेझ सिद्धीकी उपस्थित होते. पवार म्हणाले, अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी तीन- चार क्षेत्रांत काम करावे लागेल. त्यातील एक या समाजाबद्दल चांगली भावना तयार करणे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : नऊ बकऱ्या फस्त करणारा महाकाय अजगर असा पकडला..

दुसरे या समाजातील मुलांच्या शिक्षणाकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल. उर्दू भाषेला माझा विरोध नाही. ती चांगली भाषा आहे. ती पुढेही शिकवली गेली पाहिजे. परंतु देशातील सर्वाधिक शिक्षित केरळमध्ये अल्पसंख्यकांच्या शिक्षणाबाबत काय होते, हे आपल्याला बघावे लागेल. तेथे अल्पसंख्यांकांची लोकसंख्या मोठी असतांनाही मुले स्थानिक भाषेत शिक्षणावर जोर देतात. नोकरीत अल्पसंख्यांकाची संख्याही कशी वाढवता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. चित्रपट क्षेत्रात अल्पसंख्यांक समाजातील तरुण चांगले काम करत आहेत. या समाजाच्या सगळ्या प्रश्नांवर अर्धा तासात चर्चा शक्य नाही. त्यामुळे दोन ते तीन आठवड्यात पुन्हा येऊन या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. मुस्लिमांची सुमारे ९० टक्के मुले शासकीय शाळेत शिकतात. परंतु या शाळांचे अद्यावतीकरण होत नसल्याने त्याचा मोठा फटका या समाजाच्या मुलांना बसतो. केंद्र व राज्यात काँग्रेसचे सरकार असतांना मुस्लिमांना आरक्षण मिळाले. परंतु, त्यासाठी केवळ अध्यादेश निघाला. कायदा केला नसल्याने हे आरक्षण गेले.

हेही वाचा >>> देशातील चित्ता पर्यटन लवकरच शक्य; देखरेखीसाठी ‘टास्क फोर्स’; नऊ सदस्यांचा समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या सरकारने मराठ्यांच्या आरक्षणाचा आग्रह धरला, परंतु मुस्लिमांना ते नाकारले. सध्या देशात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगत मुस्लिमांची मते मागतात. परंतु या समाजासाठी वेळीच पुढे येण्याचे टाळले जाते. नोकऱ्यांमध्ये आजही हा समाज मागे आहे. निवड मंडळाकडून या समाजाच्या नियुक्तीसाठी दुर्लक्ष करणेही एक कारण आहे. त्यामुळे प्रत्येक निवड मंडळावर एक मुस्लीम सदस्य आवश्यक असल्याचे, ॲड. फिरदोज मिर्झा म्हणाले. २००९ ते २०१४ दरम्यान सर्वाधिक मुस्लीम तरुणांना सुरक्षा यंत्रणांनी देश विरोधी कृत्याच्या नावावर अटक केली. परंतु कुणालाही शिक्षा झाली नाही. श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालानंतर संबंधितांवर गुन्हाही दाखल झाला नसल्याकडेही मिर्झा यांनी लक्ष वेधले.