नागपूर : नागपूर येथील रहिवासी सुनीता जामगडे प्रकरणी नवीन माहिती उघडकीस आली आहे, ती तीन पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कात होती.
पाकिस्तानात घुसखोरी करणाऱ्या महिलेवर हेरगिरीचा संशय व्यक्त करीत अमृतसर पोलिसांनी तिच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि हे प्रकरण कपिलनगर पोलिसांकडे वर्ग केले. तोच धागा पकडून कपिलनगर पोलीस पुढील तपास करणार आहेत.

काय आहे प्रकरण

पंजाब न्यायालयात काम आहे. न्यायालयाचे काम आटोपल्यानंतर काश्मीर फिरायला जाणार असे सांगून सुनीता ४ मे रोजी स्वतःच्या १२ वर्षीय मुलासोबत घरून निघाली होती. कारगिल बॉर्डरवरील शेवटचे गाव असलेल्या हुंदरमानमध्ये ती पोहोचली. तिथे गेल्यानंतर मुलाला परत येते असे सांगून एकटीच निघून गेली. तत्पूर्वी मुलाला घरी पाठवित असल्याचे बहिणीला फोन करून सांगितले. स्थानिक लोकांनी मुलाला लद्दाख पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

पोलिसांनी तिचा मोबाईल, आधार, मतदान कार्ड जप्त केले आहे. जप्त मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी सायबर तज्ज्ञाची मदत घेतली जाईल. मोबाईलमधील चॅट आणि डाटा डिलिट झाला असेल तर तो पुन्हा रिकव्हर करून सखोल तपास केला जाईल. मागील काही दिवसांपासून ती पाकिस्तानातील नागरिकांच्या संपर्कात होती, असा संशय आहे.

पाकिस्तानी नागरिकांशी तिने आधी चॅटिंग केले. नंतर नियंत्रण रेषा ओलांडून ती पाकिस्तानात गेली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती असताना ती पाकिस्तानात गेली, याकडे पोलिसांनी यांनी लक्ष वेधले. बर्फ दाखविण्यासाठी मुलाला कारगिलमध्ये घेऊन गेली.

हेरगिरीचा संशय असलेली सुनीता पाकिस्तान पोलिसांच्या ताब्यात ९ दिवस राहिली. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी तिला नंतर भरताच्या ताब्यात दिले. तत्पूर्वी तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून इस्लामाबादला नेले सखोल चौकशी करून अटक केली तिला कारागृहात ठेवले. २३ मे रोजी लिला बीएसएफच्या ताब्यात दिले, अशी माहिती सुनीताने पोलिसांना दिली. सुनीता पाकिस्तानात कशासाठी आणि कुणाला भेटायला गेली होती. पाकिस्तानता जाण्याचा नेमका तिचा उद्देश तरी काय आहे. हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात ती कशी काय आली. याबद्दल पोलिसांना माहिती घ्यायची आहे.

यापूर्वी ती अमृतसरला गेली होती. त्यावेळीदेखील तिने अमृतसरमधून पाकिस्तानला जाण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांनी तिला पकडले. न्यायालयाच्या आदेशाने ती पोलिसांच्या ताब्यात होती. तब्बल २० दिवस ती अमृतसर पोलिसांच्या ताब्यात राहिली सुटका झाल्यानतर ती १ मे रोजी कपिलनगरातीत घरी परतली, तीन दिवस राहिल्यानंतर पुन्हा ४ मे रोजी आपल्या १२ वर्षीय मुलासोबत धरून निघाली पंजाब न्यायालयात काम असल्याचे तिने घरी सांगितले होते. काम आटोपत्यानंतर जम्मू-काश्मीर फिरायला जाणार असल्याचे ती म्हणाली होती. यावेळी तिने नेपाळ भूतान, अरुणाचलप्रदेश राजस्थान, जम्मू-काश्मीर आदी ठिकाणी फिरायला गेली

कारगिल बॉर्डरवरील शेवटचे गाव असलेले हृदरमानमध्ये ती पोहोचली. पाकिस्तान सीमेत दाखल झाल्यानंतर सीमेवरील जवानांनी तिला ताब्यात घेतले. हेलिकॉप्टरने तिला इस्लामाबदला नेण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवऱ्यापासून विभक्त

सुनीता जामगडे हीचा १८ वर्षापूर्वी लग्न झाला. पती कुठलाच कामधंदा करीत नसल्याने ती त्याच्यापासून विभक्त झाली. ती गेल्या ११ वर्षापासून मुलासह आईकडेच राहते. तिला एक बहीण आणि दोन भाऊ आहेत.