नागपूर : कपीलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांची शासकीय पिस्तूल हरवली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अशोक कोळी हे कपीलगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार असून गोटाळ पांझरी येथे बंदोबस्तावर होते.

हेही वाचा : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी होते रावणाची पूजा, काय आहे कारण व प्राचीन प्रथा जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, त्यांच्या पिस्तूलचे कव्हर रिकामे दिसले. त्यांनी पिस्तूल शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळपर्यंत ते सापडले नाही. त्यामुळे त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली आणि पोलीस ठाण्यात पिस्तूल हरविल्याची नोंद केली. रात्री उशिरापर्यंत पिस्तूलाच शोध सुरु होता. जर ती पिस्तूल कोण्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाच्या हातात लागल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे.