नागपूर : गेल्या अनेक महिन्यांपासून नागपूर पोलिसांना गुंगारा देत फिरणारा कुख्यात अमली पदार्थ तस्कर आबू खानला सक्करदरा पोलिसांनी अटक केली. आबूला सापळ्यात अडकविण्यासाठी पोलिसांनी चक्क मुस्लीम शेतमजुरांचा वेश धारण केला होता.

फिरोज ऊर्फ आबू खान याच्यावर मध्यप्रदेश, गुजरात, गोवा, उत्तराखंड यासह महाराष्ट्रातील अनेक ड्रग्स तस्करीसह मोक्का, चोरी, घरफोडी, लुटमार, खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, भूखंडावर अवैध ताबा असे गंभीर स्वरुपाचे जवळपास ३५ गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आबूवर मोक्का लावला होता. त्यातून तो फरार होता.

गेल्या काही महिन्यांपासून पोलीस उपायुक्त नरूल हुसन, सहायक आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक सागर आवाड, कर्मचारी नितीन, नीलेश, हेमंत आणि गुन्हे शाखेचे दीपक तऱ्हेकर हे आबूच्या मागावर होते. आबू हा भंडारा शहराजवळ असलेल्या बासुरा टोळा या गावातील एका मशिदीजवळ एका घरात लपून बसला होता.

हेही वाचा : संतापजनक! अमरावतीमध्ये शेतकऱ्याला मारहाण, खायला लावली मानवी विष्ठा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माहिती मिळताच शनिवारी दुपारी पथक गावात पोहचले. पोलिसांनी शेतमजुरांचा वेश धारण केला. टेहळणी केल्यानंतर रात्रभर पहारा दिला. पहाटे तीन वाजता घेराव घालून आबूला अटक केली. या कामगिरीचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कौतूक केले असून ५० हजारांचे बक्षीस पोलीस पथकाला घोषित केले आहे.