नागपूर : नागपुरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करायची असेल तर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक आणि नैतिक दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. मात्र, सध्या वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रणावर नव्हे तर वसुलीवर भर देत असल्याची चित्र गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. याच कारणामुळे पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेतील ६०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, हे विशेष.
शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी हा नेहमीचा विषय झाला आहे. कोंडी फोडण्यासाठी अनेकदा वाहतूक पोलीस हजर नसतात किंवा त्यांच्या जबाबदारीचा भाग नसल्याचे ते समजतात. वर्धा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police emphasis on recovery not traffic control adk 83 ysh