नागपूर : भारतीय पोलीस सेवेत अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे घोषणा केली जाते. यात गुरुवारी जाहीर मानाच्या पुरस्कारांमध्ये नागपुरातील विद्यमान सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह नागपूर पोलीस दलातून आणखी तीन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात नागपूरातून राष्ट्रपती पदक पुरस्कारासाठी निवड झालेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र कृष्णराव हिवरे, उप महानिरीक्षक प्रमोदकुमार परशराम शेवाळे, उपनिरीक्षक अनिल कृष्णराव ब्रह्मणकार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
राष्ट्रपती पदक पोलीस पुरस्कारासाठी राज्यातून निवड झालेल्या अन्य पोलीस अधिकाऱ्यांमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय शंकर ढोले, उप पोलीस अधीक्षक संजय सुभाष चांदखेडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेन्द्र रघुनाथ ढिवर, ज्योती अरविंद देसाई, राजन आबाजी माने, पोलीस निरीक्षक, दीपककुमार चुडामन वाघमारे, रवींद्र अंबुजी वाणी, उपनिरीक्षक संदीप शांताराम शिंदे, संदीप यशवंत मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ दत्त राऊळ, रमेश नथूजी ताजणे, धोंडिबा माधवराव भुट्टे, हर्षकांत काशिनाथ पवार, प्रमोद कारभारी पवार, आंचल ईश्वरप्रसाद मुदगल, उपनिरीक्षक जोसेफ मॅरियन डिसिल्वा, सुनील भाऊराव चौधरी, पोलीस निरीक्षक सत्यवान आनंद माशाळकर, सतीश भगवान जाधव, ओहर्सिंग द्वारका पाटलेसहाय्यक उपनिरीक्षक अशोक सोनू जगताप, दीपक सुगनसिंग परदेशी, राजेंद्र गोपाळराव मोरे, जितेंद्र जगन्नाथ कोंडे, संजय दामोदर शिरसाट, उप पोलीस अधीक्षक बालासाहेब यशवंत भालचिम, आनंदराव मारुती पवार , सहाय्यक कमांडंट सुरेश दिगंबर कराळे, रमेश बाबन वेठेकर, सुभाष माधुकर हांडगे, पोलीस निरीक्षक विश्वास रोहिदास पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक अविनाश रामभाऊ नावेरे, अनंत विष्णुपंत व्यवहारे, हेड कॉन्स्टेबल संजीवकुमार काशी माथूर, रमेश खुशालराव कुंभाळकर यांचा समावेश आहे.
या खेरीज अग्निशमन सेवा पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून अग्निशमन अधिकारी, भगवत श्रीराम सोनवणे, स्टेशन ड्युटी अधिकारी, सुभाष प्रभाकर जाधव, उपमुख्य अग्निशमन अधिकारी छगन ताराचंद मोरे, लीडिंग फायरमन, भगवंत बाबन शिंगाडे, फायर इंजिन चालक रामचंद्र तुकाराम गोसावी यांचा समावेश आहे. कारागृह सुधार सेवेबद्दल कारागृह अधिक्षक राणी राजाराम भोसले , अतिरिक्त अधिक्षक राजाराम रावसाहेब भोसले , उप अधीक्षक गजानन काशिनाथ सरोदे, सुभेदार संजय गंगाराम शिवगण , हवालदार सुधाकर ओंकार चव्हाण, राजेश माधुकर सावंत, संजय सदाशिव जाधव आणि कारागृह शिपाई भारत धेंबरे यांचा समावेश आहे.
नक्षल विरोधी सेवेबद्दल चार जणांना विशेष पुरस्कार
राज्यातील नक्षल प्रभावित जिल्ह्यामध्ये सलग तीन वर्षे खडतर परिस्थितीत सेवा देणाऱ्या पोलीसांना गृह विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे विशेष सेवा पदकेही प्रदान केली जातात. यात राज्यातील नक्षल प्रभावित जिल्ह्यांमधील ५१ पोलीसांना विशेष पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यात नागपूरातून वैशाली बाबुराव कुकडे (शेंडे), लक्ष्मी सोमाजी गोखले, शितल वसंत खडसे, शिला मधुकर बडोले या महिला पोलीसांसह राजेश नत्थुजी सोनटक्के यांची निवड करण्यात आली. या पाचही जणांनी गडचिरोली सारख्या नक्षलप्रभावित जिल्ह्यांमध्ये सलग तीन वर्षे खडतर सेवा दिली.