नागपूर: सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी, हैदराबाद संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त देशभरात एकाचवेळी झालेल्या कार्यक्रमात नागपूर पोलीस आणि इतरही सुरक्षा यंत्रणा सहभागी झाल्या. उपस्थित पोलिसांनी यावेळी निरोगी राहण्यासाठी ५ किलोमिटर धावण्यासह विविध गान्यांवर नृत्यही केले.

निरोगी राहण्यासाठी धावण्यासह नृत्य करणाऱ्यांमध्ये नागपूर शहर पोलीस दल, नागपुर ग्रामीण पोलीस दल, नागपुर लोहमार्ग पोलीस दल, महीला पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपुर, रा. रा. पो. बल गट क. ०४, गट क. १३, व गट क. १५ इत्यादी दलांचाही समावेश होता. नियोजित कार्यक्रमाचा शुभारंभ हैद्राबादहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑनलाईन पद्धतीने केला. त्यानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूरच्या मैदानात उपस्थित पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पाच किलोमिटर धाव घेतली. त्यानंतर विविध गाण्यावर मनसोक्त झुंबा आणि इतरही नृत्य केले.

हेही वाचा… पूर्व विदर्भातील संपकर्त्यांची संख्या वाढली; रुग्णांचा जीव टांगणीला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रसंगी प्रामुख्याने शहर पोलीससह इतरही सुरक्षा यंत्रणांतील प्रमुख अधिकारी असलेले अमितेश कुमार, छेरींग दोरजे, अश्वती दोरजे, संजय पाटील, हर्ष पोद्दार, अक्षय शिंदे, अश्विनी नरनावरे, विवेक मसाळ, लक्ष्मीकांत पाटील, प्रशांत कुलकर्णी आणि इतरही अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.