नागपूर : शहरात पिस्तुलाची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यामुळे गुन्हे शाखेपुढे शहरातील गोळीबाराच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले होते. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पोलिसांनी गस्त वाढवली. एका युवकाच्या घरातील हालचालींवर पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी घरावर छापा घातला. या छाप्यात दोन काडतूस आणि पिस्तुलसह खरेदी-विक्री करणाऱ्यांची साखळीसुद्धा गवसली. पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. मोहम्मद फिरोज मोहम्मद आबिद अंसारी (२४) रा. दीनबंधू सोसायटी, गुलशननगर, करीम राजा मोहम्मद युनूस (२४) रा. मेमन कॉलनी, जुना कामठी रोड, कळमना आणि मोहम्मद शाकिब उर्फ पटेल मोहम्मद सिद्दीकी (२८) रा. संजीवनी कॉलनी, यशोधरानगर, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. फरार आरोपी अब्दुल सोहेल उर्फ सोबू (रा. सतरंजीपुरा) आणि अजहर (रा. यशोधरानगर) यांचा शोध सुरू आहे.़

हेही वाचा : प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police raid on a home where pistols trading took place 3 arrested adk 83 css
First published on: 05-04-2024 at 00:05 IST