नागपूर : भारतीय डाक विभागाने नव्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून ज्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाची गरज आहे अशा राज्यासोबत समन्वय साधून ड्रोनद्वारे अत्यावश्यक सेवा टपाल खात्याच्या माध्यमातून पोहोचवण्याचा विचार असल्याचे नागपूर क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल (विदर्भ) शुभा मधाळे यांनी सांगितले. नागपूर टपाल खात्यातर्फे रविवारपासून १३ ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय टपाल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… नागपूर शहरातील वाहतूक सिग्नल बंद ; वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांची होतेय गैरसोय

त्याची माहिती देताना मधाळे म्हणाल्या, की देशात १ लाख ५५ हजाराहून अधिक टपाल कार्यालये आहेत. या कार्यालयाच्या माध्यमातून ‘स्पीड पोस्ट’, ‘बिझनेस पोस्ट’, ‘ई-पोस्ट’,‘आधार अपडे’ आणि नावनोंदणी, ‘पासपोर्ट’ यांसारख्या सेवांसह अनोंदणीकृत मेल, नोंदणीकृत मेल, पत्रे, पार्सल, बचत बँक, पोस्टल विमा या पारंपरिक सेवा प्रदान केल्या जातात. १८७४ मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना झाली होती. त्याच्या वर्धापनदिनानिमित्त, टपाल विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा केला जातो.

हेही वाचा… सर्वधर्मसमभाव ही हिंदुत्वाची आधारशिला ; नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

रविवारपासून सप्ताहाला सुरुवात झाली असून यावर्षीची संकल्पना ‘पोस्ट फॉर द प्लॅनेट’ ही आहे. १० ऑक्टोबर रोजी वित्तीय सशक्तीकरण दिवसानिमित्त पोस्ट ऑफिस बचत बँक खाती / इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाती उघडण्यासाठी आणि पोस्टल विम्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. मंगळवारी ११ ऑक्टोबरला टपाल तिकीट संग्रह दिनी शालेय मुलांसाठी एक छंद म्हणून स्पर्धा, चर्चा आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा… नागपूर : अंबाझरी तलावात बुडून मुलाचा मृत्यू ; दहा महिन्यातील बारावा बळी

गडचिरोली भंडारासारख्या जिल्ह्यात चंदूपत्ता, महुवा, हिरडा यासारख्या लघु वनोपजावर तसेच बुलढाण्याच्या जगप्रसिद्ध लोणार सरोवर यावर टपाल तिकीट तयार करण्याच्या संचाचे अनावरण करण्यात येईल, असे शुभा मधाळे यांनी सांगितले. १२ ऑक्टोबर रोजी मेल आणि पार्सल दिवस असून या दिनी ग्राहकांसाठी ग्राहक मेळाव्याचे आयोजन विभागीय स्तरावर केले जाईल.

हेही वाचा… ‘‘काळ आला होता, पण…’’ साफसफाई करताना विषारी नागच धरला हाती..

या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी १३ ऑक्टोबर रोजी अंत्योदय दिवस असून यात आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण शिबिरे ग्रामीण व दुर्गम भागात आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आयोजित केली जातील. मागील आर्थिक वर्षात नागपूर विभागाने ४३.६१ कोटींचा महसूल गोळा केला. तसेच नागपूर विभागातील ३०१ गावे ३१ ऑगस्ट २०२२ रोजी संपूर्ण विमा ग्राम म्हणून घोषित करण्यात आली, असे टपाल सेवा विभागाचे संचालक महेंद्र गजभिये यांनी सांगितले. याप्रसंगी वरिष्ठ टपाल अधिक्षक रेखा रिझवी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur postal service going to use drones for essential items asj
First published on: 10-10-2022 at 10:27 IST