नागपूर : ज्येष्ठ व्हायोलिन वादक, संगीतकार सूरमनी पं. प्रभाकर धाकडे यांचे शनिवारी सायंकाळी एका खाजगी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्याच्या पश्चात पत्नी उर्मिला, मंगेश, कौशिक आणि विशाल ही तीन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. उद्या रविवारी सकाळी ११ वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

हेही वाचा >>> बंजारा समाजाला सनातन धर्माशी जोडण्याचे भाजप, संघाचे षडयंत्र; देवानंद पवार यांचा गंभीर आरोप

Senior Gandhian Dhirubhai Mehta passed away
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी
thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Sharad Pawar supporter Praveen Mane join mahayuti
शरद पवार यांचे कट्टर समर्थक महायुतीमध्ये सहभागी… झाले काय?
Sharad Pawar NCPs Kolhapur District Youth President Nitin Jambhale passed away
शरद पवार राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष, इचलकरंजीचे माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचे निधन

गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते त्यामुळे  त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. २५ ऑक्टोबरला १९४९ मध्ये आरमोरी येथे जन्मलेले प्रभाकराव धाकडे यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी अपघाताने कायम अंधत्व आले. त्यामुळे वडिलांनी त्यांना माता कचेरी येथील अंध विद्यालयात दाखल केले होते. प्रभाकररावांना संगीताचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता.

हेही वाचा >>> “…तर नागराज मंजुळे पोलीस शिपाई असते!”, स्वत:च सांगितला ‘तो’ किस्सा

अंध विद्यालयात त्यांनी बननराव कान्हेरकर, पाठकमास्तर, केशवराव ठोंबरे यांच्याकडून व्हायोलिन तर पिट्टलवार यांच्याकडून तबल्याचे शिक्षण घेतले होते. शिक्षण झाल्यानंतर १९६७ मध्ये एससीएस गर्ल्स हायस्कूल येथे संगीत शिक्षक म्हणून नोकरी केली. वडिलांच्या निधनानंतर उत्तर नागपुरातील इंदोरा परिसरातील वडिलांनी सुरू केलेल्या भास्कर संगीत विद्यालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. ते आकाशवाणीचे अ श्रेणीचे कलावंत होते. जपानला झालेल्या आंतरराष्ट्रीय संगीत समारोहात त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. 

हेही वाचा >>> फार्महाऊसमध्ये कोंडून तीन वर्षे बलात्कार; पीडित मुलगी ११ दिवसांच्या बाळासह ताब्यात

त्यांना मुंबईच्या सूरसिंगार संगीत संस्थेतर्फे सुरमणी ही पदवी बहाल करण्यात आली होती.  रवींद्र साठे, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आदी कलावंतांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गीते सादर केली.  गेल्या महिन्यात झालेल्या  खासदार सांस्कृतिक महोत्सवात त्यांचे व्हायोलिन वादन झाले आणि तोच त्यांचा शेवटचा जाहीर कार्यक्रम ठरला.