नागपूर – राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ ओळखपत्र घोटाळा प्रकरणाचा तपास करीत असलेल्या सायबर पथकाने शनिवारी सायंकाळी या प्रकरणात आणखी दोन मुख्याध्यापकांना नागपूर येथून अटक केली. तपास पथकाकडून अटक दोन्ही ही मुख्याध्यापकांनी शाळेत कार्यरत एकूण ७ शिक्षकांची बेकायदेशीरपणे नियुक्ती केल्याचे तपास पथकाला आढळले आहे.

सायबर पथकाने शनिवारी अटक केलेल्या दोन मुख्याध्यापकांपैकी शेषराव आसाराम कुथे हा वाठोडा लेआऊटच्या शैलेश नगरातल्या ओमनगर उच्च प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक आहे. तर दुसरा हेमंत मधुकर राठोड हा मानेवाडातल्या उच्च प्राथिमक शाळेचा मुख्याद्यापक आहे. सायबर शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी या अटकेला दुजोरा दिला.

सायबर पथकाने अटक केलेला मुख्याध्यापक कुथ याने ३ सहाय्यक शिक्षकांची तर राठोडने ४ सहाय्यक शिक्षकांची बेकायदेशिर नियुक्ती असल्याचे व त्यांचे बनावट शालार्थ आय. डी तयार केल्याचे आढळले आहे. या दोघांनी नियमीत वेतनाशी संबंधातील प्रस्ताव आपल्या स्वाक्षरीने दर महिन्याला वेतन अधिक्षक कार्यालयास पाठविले होते. सायबर शाखेने अटक केलेल्या दोन्ही मुख्याध्यापकांनी स्वतःचा आर्थिक फायदा करून शासनाची फसवणुक केल्याचा ठपका तपास पथकाने दोघांवर ठेवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटक आरोपी संख्या २३वर

विशेष तपास पथकासह समांतर तपास करणारी सायबर शाखा या घोटाळ्याची पाळेमुळे खणत आहे. या दोन्ही तपास यंत्रणांनी मिळून आतापर्यंत २३ जणांना अटक केली आहे. सायबर सेलने या प्रकरणात आतार्यंत ९ तर विशेष तपास पथकाने १४ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक नरड, नाईक आणि वंजारी या तिघांवर दोन्ही तपास पथकाने संयुक्त कारवाई केली आहे.