नागपूर : सराफाच्या दुकानात नोकरी बनून सोन्याचा बिस्किट चोरणाऱ्या टोळीचा तहसिल पोलिसांनी भंडाफोड केला. दोन आरोपींना अटक करून त्याच्याकडून ५५ ग्रॅम सोन्याचे बिस्किट जप्त करण्यात आले आहेत. वैभव मालगावे (रा. ईचलकरंजी) आणि जगन्नाथ जावीर (रा. खंबाळे, सांगली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या टोळीतील दोन म्होरके फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या टोळीने दिल्लीतही अशाच प्रकारची चोरी केली. कोलकाता येथेही चोरी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जुनी शुक्रवारी येथील रहिवासी फिर्यादी सदाशिव सूर्यवंशी (५५) यांचे इतवारी मार्गावर सूर्यवंशी रिफायनरी नावाने दुकान आहे. त्यांच्याकडे सोन्याचे बिस्किट तयार केले जातात. आरोपी वैभवने मार्च महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात फिर्यादीला फोन केला. ‘तुमच्या गावचा रहिवासी आहे. मला कामाची आवश्यकता आहे. बिस्किट बनविण्याचे काम मला येते,’ असे सांगून त्यांना विश्वासात घेतले. गावचा युवक असल्याने त्यांनी युवकाला प्रत्यक्षात भेटण्यास सांगितले. त्याने सूर्यवंशी यांची प्रत्यक्षात भेट घेतली. त्यांनी त्या युवकाला कामावर ठेवले. तो त्यांच्या घरीच राहायचा.

घटनेच्या दिवशी फिर्यादी कामानिमीत्त बाहेर होते. त्यावेळी त्यांचा मुलगा दुकानात होता. दरम्यान तो लघुशंकेला गेला. हीच संधी पाहून आरोपीने ड्राव्हरमधून सोन्याचा बिस्किट चोरले आणि पळाला. विशेष म्हणजे ड्राव्हरला चावी लागलीच होती. त्यामुळे त्याला सहजपणे चोरता आले. फिर्यादीचा मुलगा दुकानात आला असता नोकर दिसला नाही तसेच सोन्याचे बिस्किटही दिसले नाही. त्याने फिर्यादीला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच चोरीचा छडा लावण्यासाठी एक पथक तयार केला.

आरोपीचे छायाचित्र, आधार कार्ड नव्हते

फिर्यादीकडे युवकाचा फोटो सुध्दा नव्हता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचे छायाचित्र घेतले. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचे लोकेशन शोधले. वैभव आणि जगन्नाथ या दोघांना अटक करून त्यांना नागपुरात आणले. सखोल चौकशीत दिल्ली येथील सराफाच्या दुकानात नोकर बनून त्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी कोलकाता येथे सुध्दा अशाच प्रकारे चोरी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कामगिरी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सगल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख, संदीप बुवा यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रमीज शेख, रसूल शेख, पोहवा संजय शाहु, संदीप गवळी, सुनील सेलोकर, वैभव कुलसंगे, कुणाल कोरचे, महेंद्र सेलूकर यांनी केली.