नागपूर : नागपूरहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत नागपुरात परतले. उड्डाणानंतर विमानाच्या इंजिनमध्ये कंपन जाणवल्याने वैमानिकाने तत्काळ विमान परतण्याची परवानगी मागितली. विमान सुरक्षितपणे उतरल्यावर वैमानिकाने संशय व्यक्त केला की उड्डाणादरम्यान विमानाला पक्षी धडकला असावा.

विमानाची तपासणी केल्यानंतर तांत्रिक कारणास्तव ते विमान सध्या ग्राउंड करण्यात आले आहे, अशी माहिती विमानतळ सूत्रांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६.४० वाजता एअरबस ३२० विमानाने उड्डाण केले होते. त्यावेळी सुमारे १५० प्रवासी विमानात होते. प्रवाशांना नंतर प्रवास भाडे परत करण्यात आले.

विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणाच्या अवघ्या पाच मिनिटे आधी इंडिगो एअरलाइन्सचे दिल्लीसाठी दुसरे विमान उडाले होते, ते मात्र सुरक्षितपणे गंतव्यस्थानी पोहोचले. रात्रीच्या वेळी उड्डाण झाल्याने पक्षी रात्री उडणाऱ्या पक्ष्याची धगकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विमानतळ परिसरात २४ तास पक्षी निरीक्षक तैनात असले तरी रात्री पक्षी ओळखणे कठीण जाते. दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजामुळे पक्षी विमानतळ परिसरातून दूर जातात, असे एका अधिकाऱ्याने नमूद केले.

अलीकडच्या काळात नागपुरात ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यातही एअर इंडियाच्या विमानाला पक्षीधडक बसून त्याच्या नोज कोनला नुकसान झाले होते. त्या वेळी धावपट्टीवर गरुड पक्षी धडकले होते.

दरम्यान, नागपूर विमानतळावर आजवर कोणताही मोठा अपघात झालेला नाही, परंतु अलीकडेच दोन घटनांमध्ये मोठी दुर्घटना टळली: १) २ सप्टेंबर २०२५ रोजी एका इंडिगो विमानाची पक्ष्यांशी धडक झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावी लागली, ज्यात सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. २) १४ जून २०२५ रोजी बॉम्बची धमकी मिळाल्याने एका इंडिगो विमानात नागपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले, ज्यात सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

पक्षी धडक: २ सप्टेंबर २०२५ रोजी, नागपूरहून कोलकाताला जाणाऱ्या एका इंडिगो विमानाच्या पुढच्या भागाला पक्ष्यांची धडक लागली. यामुळे वैमानिकांनी तातडीने आपत्कालीन लँडिंग केले. विमानातील सर्व २७२ प्रवासी सुरक्षित आहेत.

बॉम्बची धमकी: १४ जून २०२५ रोजी, कोची-दिल्लीला जाणारे एक इंडिगो विमान बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर नागपूरमध्ये आपत्कालीन लँडिंगसाठी वळवण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले होते आणि या घटनेतही कोणतीही हानी झाली नाही.