गोंदिया : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण १८ संचालका पदांसाठी रविवारी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात एकूण ११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, एकूण ८९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पढावी, यासाठी जिल्हा सहकार निबंधक विभागाने योग्य नियोजन केले आहे.

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक महत्त्वपूर्ण समजली जाते. जिल्हा बँकेचे एकूण २० संचालक असून, त्यापैकी माजी आमदार राजेंद्र जैन आणि प्रफुल्ल गोपालदास अग्रवाल यांची बिनविरोध निवड झाल्याने आता प्रत्यक्षात १८ संचालक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. जिल्हा बैंक निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहकार पॅनल तयार करून ही निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेस इतर पक्षांसह परिवर्तन पॅनल तयार करून निवडणूक रिंगणात आहे.

ही निवडणूक खा. प्रफुल्ल पटेल, कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिष्ठेची केली आहे. तर भाजप नेत्यांनी सुद्धा या निवडणुकीत पूर्णपणे जोर लावला आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. रविवारी मतदान होणार असून, सोमवार ३० जून रोजी फुलचूर येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित विभागाने निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत मोजकेच मतदार असल्याने व दोन्ही पॅनलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.जिल्ह्यात सहकार क्षेत्रावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची चांगली पकड आहे. त्यातच प्रथमच ही निवडणूक हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन लढत असल्याने या निवडणुकीत सर्वाधिक जागा निवडून आणत सत्ता स्थापन करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.तर काँग्रेसने इतर पक्षांसह निवडणूक रिंगणात उतरून पूर्णपणे जोर लावला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे सोमवार ३० जून रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

गोंदिया फुलचूर येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात असून, या केंद्रांवरून सर्वाधिक ६३६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
तर गोरेगाव, सालेकसा, आमगाव, तिरोडा, सडक अर्जुनी, देवरी येथील मतदान केंद्र जिल्हा बँकेच्या शाखेत ठेवण्यात आले आहे. तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मतदान केंद्र हे खरेदी-विक्री सोसायटीच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यटनावरून मतदार थेट केंद्रावर

जिल्हा बँकेची निवडणूक सहकार आणि परिवर्तन पॅनलने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. तर या निवडणुकीत ८९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मोजकेच मतदार असल्याने त्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन्ही पॅनलकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी तीन-चार दिवसांपूर्वीच पर्यटनाला नेण्यात आले होते. हे मतदार रविवारी थेट मतदान केंद्रावरच पोहोचून मतदान करीत आहेत.