नागपूर : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजपा सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याने जनतेत तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण घाईघाईने केले होते. राजकीय लाभ उठवण्यासाठी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केल्याने लोकांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. आता पंतप्रधान मोदी स्थानिकांचा विरोध डावलून पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे भूमीपूजन करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज “मोदी माफी मागा” नावाने आंदोलन सुरु आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे मोकाट आहेत आणि त्यांना जाब विचारणारे शिवप्रेमी नजरकैदेत ही सरकारची कार्यपद्धती आहे. आज या सरकारने प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार अमिन पटेल यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. हे सरकार घाबरट असून या सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप असून जनता आता यांना धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असे पटोले म्हणाले.

हेही वाचा…वडील व मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा, काय घडले?

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या बंदराचे भूमीपूजन होत आहे. स्थानिकांचा विरोध डावलून पंतप्रधानांच्या ‘खास’ मित्राच्या फायद्यासाठी हे बंदर उभारले जात आहे. पंतप्रधानांचा दौरा असल्याने विरोध करणाऱ्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवणे मोगलाईपेक्षा वाईट आहे पण आता जनताच भाजपाला नजरकैदेत ठेवेल, असे नाना पटोले म्हणाले.

पंतप्रधानांच्या हस्ते या बंदराचे भूमीपूजन होत आहे. हे बंदर पंतप्रधानांच्या खास मित्राच्या फायद्यासाठी उभारले जाणार आहे, स्थानिकांचा त्याला तीव्र विरोध आहे. पंतप्रधानांचा दौरा असल्याने विरोध करणाऱ्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. विरोधकांना नजरकैदेत ठेवणे मोगलाईपेक्षा वाईट आहे, पण आता जनताच भाजपाला नजरकैदेत ठेवेल, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा…समृद्धी महामार्गावर टो‌‌ल घेता, पण सुविधा देत नाही… उच्च न्यायालय म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय लाभ उठवण्यासाठी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केल्याने लोकांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री माफी मागत असले तरी त्याचा काही फायदा नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा घणाघाती हल्ला नाना पटोले यांनी केला आहे.