लोकसत्ता टीम
वर्धा: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०सप्टेंबर रोजी वर्धा दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सुक्ष्म व लघु मंत्रालयाच्या विश्वकर्मा योजनेच्या अनुषंगाने हा कार्यक्रम होत आहे. यावेळी योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश व साहित्याचे वाटप होईल. तशी पाहणी खात्याचे केंद्रीय सचिव करून गेले. योजनेतील २० हजार लाभार्थी देशभरातून यात सहभागी होणार. तसेच प्रामुख्याने वर्धा जिल्ह्यातील कारागीर अधिक संख्येत राहणार असून त्यांच्यासाठी साडे सातशे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाजप नेत्यांचे काय ?

हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा शासकीय योजनेसाठी राहणार. त्याची आखणी संबंधित मंत्रालयाने केली आहे. तसेच अन्य सोपस्कार  पंतप्रधान कार्यालय करणार, हे स्पष्ट आहे. एनडीएचे पंतप्रधान असा उल्लेख आता होत असला तरी भाजप नेत्यांना ते आपले पंतप्रधान असल्याची भावना लपून नाही. म्हणून भाजप नेत्यांचे काय, असा पेच पक्षीय पातळीवार पडला. तो दूर करण्यासाठी आज जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आमदार डॉ. पंकज भोयर व माजी खासदार रामदास तडस हे दुपारी उशीरा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची वेळ घेऊन भेटले. त्यावेळी  सर्वप्रथम हा पूर्णतः सरकारी  कार्यक्रम असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र पीएमओ  सर्व काही ठरविणार. त्यांचेच निर्देश व्यासपीठावरील उपस्थिती, भाषणे, स्वागत, अती महत्वाचे व्यक्ती याबाबत चालणार. सभेतील उपस्थिती बाबत जिल्हा प्रशासन सर्व ते अपेक्षित करणार, असे सांगण्यात आले.

हेही वाचा >>>नागपूर: बेरोजगारांना संधी, नोंदणीचा शुक्रवार अखेरचा दिवस……

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकप्रतिनिधी व गर्दीचे काय ?

पंतप्रधान मोदी यांच्या स्टेजवर कोणाला स्थान मिळणार तसेच सभेतील गर्दी जमवण्याचे काय, असे प्रश्न पक्षीय पातळीवर  उपस्थित करण्यात आले होते. तेव्हा आमदार, जिल्हाध्यक्ष अशांचे काय, या प्रश्नावर उत्तर निघालेले नाही. गर्दी प्रामुख्याने विश्वकर्मा लाभार्थी तसेच स्टार्ट अप उपक्रमातील युवा उद्योजक यांची राहणार. सध्या किमान ४० ते ५० हजार संख्येत उपस्थिती राहणार असल्याचे म्हटल्या जात आहे. जिल्हाध्यक्ष सुनील गफाट म्हणाले की आमच्या काही शंकाचे निरसन आम्हास करायचे होते. कार्यक्रम हा केंद्र शासन पुरस्कृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात आमच्या पक्षाची काहीच भूमिका राहणार नाही. पण व्हीआयपी  पासेस तसेच पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्याची संधी याबाबत पुढेच ठरेल. विभागीय आयुक्त उदया दौऱ्याच्या संदर्भात बैठक घेणार आहे. त्यावेळी कदाचित काही बाबींचा खुलासा होणे अपेक्षित आहे.