गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील भोपाळपट्टणम् जंगल परिसरात उडालेल्या चकमकीत नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले. स्वातंत्र्यदिनाच्या रात्री प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांच्या सी- ६० पथकातील २०० जवान व डीआरजीच्या ७० कमांडोंनी मिळून अभियान राबविले होते.

१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाल्यानंतर रात्री छत्तीसगडच्या उत्तरेला बिजापूरच्या भोपाळपट्टणम (छत्तीसगड) येथील संड्रा परिसरात काही नक्षली तळ ठोकून होते, अशी माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली. त्यानुसार, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी बिजापूर येथील पोलीस अधीक्षकांना संपर्क केला.

हेही वाचा – सोने खरेदीची सुवर्णसंधी… दरात घसरण, नागपुरात आजचे दर पहा

अहेरीचे अपर अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २०० सी-६० जवान रवाना केले. बिजापूरचे सहायक अधीक्षक व ७० डीआरजी (जिल्हा रिजर्व गार्ड) कमांडो यांच्या पथकाने संयुक्त अभियान राबविले. यावेळी नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला, दरम्यान पोलीस पथकांनी प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा – रविकांत तुपकरांनी शिस्त पालन समितीसमोर जाण्याचे टाळले, राजू शेट्टींना पत्राद्वारे कळविल्या व्यथा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. मुसळधार पाऊस आणि घनदाट जंगलाचा आधार घेत नक्षल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस जवानांनी संपूर्ण नक्षली तळाची झडती घेतली असता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्यासह मोबाइल, ताडपत्री, भांडी असे संसारोपयोगी साहित्य जप्त केले आहे.