राजेश्वर ठाकरे

नागपूर : भारतीय रेल्वेने टप्याटप्प्याने नवीन तंत्रज्ञान वापर करून तयार करण्यात आलेले ‘एलएचबी’ (लिंक हॉफमन बुश) डब्यांचा वापर वाढण्यावर भर दिला असून जुने (आयसीएफ) डबे मोडीत काढण्यात येणार आहे. मात्र, या अत्याधुनिक डब्यात रेल्वे प्रवाशांना धक्के (जर्क) बसत असल्याने हा दोष दूर करण्याचे रेल्वेसमोर आव्हान आहे.

inquiry committee set up to investigate rto scam
परिवहन विभागातील घोटाळ्याच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन
ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या

रेल्वे बोर्डाने एप्रिल २०१८ पासून ‘एलएचबी’ डब्यांचे उत्पादन वाढण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. हळूहळू जुन्या ‘आयसीएफ’ डबे वापरणे बंद केले जाणार आहे. ‘एलएचबी’ डबे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले गेले असून ते अधिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येते. जुन्या डब्यांपेक्षा नवीन डबे अधिक सुरक्षित असल्याने भविष्यात हे डबे भारतीय रेल्वे वापरणार आहे. मात्र, गाडीचे ब्रेक लागल्यास किंवा गती कमी, अधिक झाल्यास प्रवशांना धक्के (जर्क) जाणवतात. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना या धक्क्यांमुळे त्रास होतो. झोप नीट होत नसल्याच्या तक्रारी आहेत. विशेषत: वयोवृद्ध आणि आजारी प्रवाशांच्या तक्रारी आहेत, असे भारतीय यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंतकुमार शुक्ला म्हणाले.

हेही वाचा >>>‘समृद्धी’वर व्हिडिओ पाहत ट्रॅव्हल्स चालविली! बहाद्दर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे म्हणाले, ‘एलएचबी’ डब्यांमध्ये ‘अ‍ॅन्टी टेलिस्कोपिक टेक्नॉलॉजी’ बसवण्यात आली आहे. त्यामुळे अपघात झाल्यास डबे एकमेकांवर चढत नाही. इंजिनचा ब्रेक लागल्यास जुने (आयसीएफ) डबे एकमेकांवर चढतात. नवीन डब्यांची ‘कपिलग’ अधिक घट्ट करण्यात आली आहे. तसेच दोन डब्यांना जोडणाऱ्या सांध्याचे अंतर देखील कमी करण्यात आले आहे. परिणामी, अपघात झाल्यास डबे एकमेकांवर चढत नाहीत. ते बाजूला पडतात. त्यामुळे जीवितहानी होत नाही किंवा फारच कमी हानी होते. भुसावळला एप्रिल २०२२ ला पवन एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले होते. या गाडीचे सर्व डबे एलएचबी डबे होते. हे डबे बाजूला पडले आणि त्यात जीवितहानी शून्य होती. मध्य रेल्वेत सध्या १५८२ डबे आहेत. आयसीएफ डबे टप्प्याटप्प्याने मोडीत काढणे सुरू आहे. तर ‘एलएचबी’चे उत्पादन मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. तसेच वंदे भारत एक्सप्रेसचे उत्पादन सुरू आहे. आयसीएफचे उत्पादन खूपच कमी झाले आहे. मानसपुरे यांनी प्रवासादरम्यान ‘एलएचबी’ डब्यातील प्रवाशांना धक्के बसततात, मात्र अनुभवी आणि कौशल्यपूर्ण चालक हे धक्कांची तीव्रता कमी करू शकत म्हटले आहे.

‘एलएचबी’च्या दोन डब्यांना जोडणारे सांधे अधिक घट्ट करण्यात आले. त्यामुळे कधी-कधी असे धक्के बसत असतात. पण, नवीन चालक किंवा चालकाचे कौशल्य कमी असल्यास असे घडते. अनुभवी चालक हळूहळू ब्रेक लावतात. त्यामुळे धक्के जाणवत नाही, असेही मानसपुरे म्हणाले.

असा आहे फरक

१) डब्याची लांबी- ‘आयसीएफ’- २१.३४ मीटर, ‘एलएचबी’- २३.५४ मीटर

२) बफरची लांबी- ‘आयसीएफ’ – २२.२८ मीटर, ‘एलएचबी’- २४ मीटर

३) डब्याची रुंदी- ‘आयसीएफ’- ३.२४५ मीटर, ‘एलचबी’- ३.२४० मीटर

४) ब्रेकचा प्रकार- ‘आयसीएफ-एअर ब्रेक’ , ‘एलएचबी’- डिस्क ब्रेक