नागपूर : पाकिस्तानमधील व्यक्तीशी व्हाट्स ऍप’वरून संशयास्पद संदेश पाठविल्या प्रकरणी आज, गुरुवारी पहाटे चार वाजता ‘एनआयए’च्या पथकाने नागपुरातील सतरंजीपुरा परिसरात छापा घातला.

हेही वाचा >>>खळबळजनक! मठातील दोन जेष्ठ नागरिकांची निर्घृणपणे हत्या

पथकाने अख्तर रजा मोहम्मद मुक्तार आणि अहमद रजा मोहम्मद मुक्तार यांची चौकशी केल्याची माहिती सूत्रानी दिली आहे. या छाप्यामुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. सध्या कुणालाही ताब्यात घेतले नसून पथकाने काही सीमकार्ड ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणी पुढील तपासासाठी काही युवकांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानातील व्यक्तीशी नागपुरातून काय बोलणे झाले किंवा कोणत्या प्रकारचा संदेश पाठवण्यात आला याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.