अकोला : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जहरी टीका केली. चंद्रशेखर बावनकुळे यांची औकात काय? असा प्रश्न करून तो मतिमंद असलेला माणूस आहे, अशा शब्दात देशमुख यांनी खरपूस समाचार घेतला.
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंनी यापुढे असे बोलल्यास घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा दिला. बावनकुळे यांच्या वक्तव्यावर नितीन देशमुख यांनी संताप व्यक्त केला.
हेही वाचा – चंद्रपूर : मधमाशांच्या हल्ल्यात नागपूरच्या दोन पर्यटकांचा मृत्यू
हेही वाचा – नागपुरात वज्रमूठ सभेवर वादाचे सावट! मैदानाच्या मुद्द्यावरून भाजपा-काँग्रेसमध्ये तनाव
नितीन देशमुख म्हणाले, ”बावनकुळे यांची औकात काय आहे? त्यांनी मातोश्रीच्या बाहेर जाऊन उद्धव ठाकरे यांना रोखून दाखवा. खरे दूध न पिलेला माणूस म्हणजे बावनकुळे आहे. त्यांच्याकडे पाहिले तर ते एक मतिमंद असलेला माणूस दिसतात. मतिमंद माणसाने अशी भाषा बोलू नये.”