नागपूर: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे रविवारी रात्री नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल आणि विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, आ.आशिष देशमुख, आ.चरणसिंग ठाकूर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केल.

सोमवारी नागपुरात नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल येथील ‘स्वस्ति निवास’ या निवासी इमारतीचे भूमिपूजन तसेच, चिचोली येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचे भूमिपूजन शहा यांच्या हस्ते झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विमानतळावर शाह यांचे स्वागत केले. त्यानंतर भाजपच्या वतीने हेडगेवार चौकात फुलांचा हार घालून शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी स्वागत केले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात उपस्थित सर्वांमध्ये उत्साह होता.
आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, संदीप जोशी, डॉ.उपेंद्र कोठेकर, संजय पांजे, माजी आमदार डॉ.मिलिंद माने, सुधाकर कोहळे उपस्थित होते. संपूर्ण हेडगेवार चौक परिसरात भारत माता की जय, भारतीय जनता पार्टी चा विजय असो, या घोषणांनी दणाणून सोडला.