नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे नेहमीच मोठे आणि अनोखे प्रयोग करीत असतात. देशभरात रस्त्यांचे विणलेले जोळे आणि उड्डाणपूल याची साक्ष देत आहेत. गडकरींचे मूळ गाव नागपूर जवळील धापेवाडा हे असून तेथे त्यांचे शेती आहे.

त्यांनी एका एकरात तब्बल १३ टण कांद्याचे उत्पादन त्यांनी घेवून दाखवले. त्यांच्या आधुनिक व नैसर्गिक शेतीमधील एका कांद्याचे वजन चारशे ते आठशे ग्राम इतके आहे. तर जवळपास एक किलोचा एक कांदा हा सर्वांच्याच कुतूहल आणि आकर्षणाचा विषय झाला आहे. त्यांच्या शेताचा आणि अमेरिकन सॅटॅलाइटचा एक अनोखा संबंध आहे. गडकरींनी नागपुरातील एका कार्यक्रमात यासंदर्भात माहिती दिली. हे तंत्रज्ञान अन्य ठिकाणी पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. काय प्रकार आहे बघा.

गडकरी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ अलीकडेच स्पेनमध्ये आधुनिक शेती पाहण्यासाठी गेले होते. तेथील व्हॅनेलिया या संत्रा जातीचे उत्पादन त्यांनी आपल्या नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा या गावातील शेतामध्ये यशस्वीपणे करून दाखवले. ही संत्री मोसंबीप्रमाणे असते. शिवाय आपल्याकडील संत्र्यांच्या तुलनेत अनेक दिवसही टिकतात आणि त्याचा गोडावही अधिक आहे. या संत्र्याचा ज्यूस जास्त चवदार आणि उपयोगी ठरत आहे. आता या स्पेनमधील संत्र्याचे व्हेनेलिया जातीचे रोपटे आपल्याही देशात उपलब्ध झाले आहे. एवढेच नव्हे तर एका एकरात आपल्या संत्र्याच्या तुलनेत पाचपट अधिक उत्पादनही होत आहे. गडकरी आपल्या शेतात जवळपास सर्व भाज्या पिकवतात. त्यासुद्धा सेंद्रीय खताद्वारे. यावर कुठलीही रासायनिक फवारणी केली जात नाही.

नितीन गडकरी नेमके काय म्हणाले?

आपण शेतकऱ्यांकरिता विदर्भातल्या काम करतो. ॲग्रो व्हिजन म्हणून आपण नुकताच मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या सहकार्याने आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन आर्टिफिशल इंटेलिजन्स इन अग्रिकल्चरची सुरुवात केली आहे. याचा अर्थ असा आहे की, माझ्याकडे जी शेती आहे धापेवडाला, ती अमेरिकन सॅटॅलाइटमधून ते बघणार आहेत. आपल्याकडे हवामानाची माहिती देणारे एक हवामान खात्याचा स्टेशन तयार केला. त्यामध्ये जमिनीत पाणी किती आहे याचे तंत्र आहे. यामुळे माझ्याकडे संत्र्याची झाड असतील तर मला कळेल की पुढच्या आठ दिवसानंतर त्या झाडावर कोणता रोग येणार आहे. झाडाला किती पाणी पाहिजे, झाडाला किती खत पाहिजे, कोणता स्प्रे करण्याची आवश्यकता आहे, हे आता मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या सहकार्याने अमेरिकन सॅटॅलाइट माझ्या शेतीचे फोटोग्राफ घेऊन मला सांगणार आहे. आता हे तंत्रज्ञान विदर्भातल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न आहे असेही गडकरी म्हणाले.