नागपूर : राज्यात मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने विजेची मागणी वाढली. त्यामुळे महावितरणकडून जास्त वीज हानी असलेल्या फिडरवर भारनियमन केले गेले. हल्ली आवश्यक वीज उपलब्ध झाल्याने भारनियमन बंद झाले. परंतु, पावसाला सुरवात झाल्याने नागपूरसह काही भागात वारंवार वीज खंडित का होते, हे आपण जाणून घेऊ या.

नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागात पावसाने मध्यंतरी दडी मारली होती. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यात तापमान वाढल्याने विजेची मागणी वाढली. त्यात मागणीच्या तुलनेत उपलब्ध वीजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरणला ५० टक्केहून जास्त वीज हाणी असलेल्या फिडरवर आपत्कालीन भारनियमन करावे लागले. या काळात चांगलेच उन पडल्याने पून्हा वीज यंत्रणा उष्ण झाली.

हेही वाचा >>> India to Bharat: ‘इंडिया’चे नाव ‘भारत’ करणे हा संघाचा अजेंडा? चार दिवसांआधी मोहन भागवत काय म्हणाले होते, वाचा

दरम्यान महावितरणकडून नियोजन करून मागणीनुसार वीज उपलब्ध केल्याने आता गेल्या तीन दिवसांपासून राज्यात भारनियमन नाही. त्यातच दोन दिवसांपासून नागपूरसह विदर्भाच्या काही भागात कमी- अधिक पाऊस सुरू झाला. त्यामुळे नागपूरसह इतरही विदर्भातील काही भागात अधून- मधून तांत्रिक कारणाने वीज पुरवठा खंडित होणे सूरू झाले. या वीज खंडित होण्याची बरीच कारणे आहे. त्यात वादळी वाऱ्यामुळे किंवा जोरदार पावसामुळे परस्परांवर आदळणा-या तारा किंवा कालांतराने निकामी झालेली विद्युत उपकरणामुळे वीज पुरवठा खंडित होतो.

हेही वाचा >>> रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! २०० रेल्वेगाड्या रद्द, यात तुमची गाडी तर नाही…?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकदा रोहित्रावर दाब वाढल्यामुळेही प्रवाह खंडित होतो. तारांवर झाडे किंवा फांद्या तुटून पडल्यानेही वीज खंडित होते. वीज पुरवठा खंडित झाल्यावर तो नेमका कुठे झाला असावा याचा अंदाज लाईनवर नेहमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येतो. लूज काँटॅक्ट, स्पार्किंग, झाड किंवा फांदी तारांना घासते का, पशु किंवा पक्ष्यांचा विद्युत तारांना स्पर्श होऊ शकतो, कोणत्या पोलवर उपकरणे निकामी झाली आहेत, कमकुवत झाली आहेत, याची माहिती त्यांना असते. अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे वीज पुरवठा लवकर सुरळीत होण्यास मदत होते.