नागपूर : आमला-नागपूर विभागातील मुलताई स्टेशनवर नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वे, नागपूर मंडळामार्फत आमला–नागपूर विभागातील मुलताई स्टेशनवर तिसरी लाईन प्रकल्पांतर्गत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग व यार्ड रिमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी २२ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार) रोजी सकाळी ०८.०० ते रात्री ०८.०० या वेळेत (१२ तास) नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे.
६१११७ नागपूर – आमला मेमू, ६११११८ आमला – नागपूर मेमू, ६१११९ नागपूर – आमला मेमू आणि
६११२० आमला– नागपूर मेमू रद्द २२ ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे. तर १२२९५ सर एम. विश्वेश्वरैया टर्मिनस बेंगळुरू –दानापूर एक्सप्रेस (२० ऑगस्ट रात्री १२.१० वाजेपर्यंत नियंत्रित) थांबवून ठेवण्यात येत आहेत. १२६४४ निजामुद्दीन – तिरुवनंतपूरम एक्सप्रेस (२२ ऑगस्ट रात्री १२.३० वाजेपर्यंत नियंत्रित) थांबवून ठेवण्यात येणार आहे.
मुंबईतील पावसामुळे आजही अनेक गाड्या विलंबाने धावत होत्या. ऑगस्टला १२१४० नागपूर ते सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस आणि २१ ऑगस्टला ११००२ बल्लारशाह ते सीएसएमटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर काही रेल्वेगाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. १२१०५ सीएसएमटी ते गोंदिया एक्सप्रेस रात्री १०.४५ वाजता, १२२८९ सीएसएमटी ते नागपूर एक्सप्रेस रात्री ११.३० वाजता आणि १२१११सीएसएमटी ते अमरावती एक्सप्रेस रात्री ११.४५ वाजता निघेल. २२१०९एलटीटी-बल्लारशाह एक्स्प्रेस आता २० आणि २१ ऑगस्टला सकाळी ७ वाजता निघेल.
१२८५९ गीतांजली एक्स्प्रेस, १२२६१ हावडा एसी दुरांतो, १२१०५ विदर्भ एक्स्प्रेस , १२२८९ नागपूर दुरांतो एक्स्प्रेस विलंबाने धावत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. महत्त्वाच्या खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सूचना देण्यात आली आहे.
मुंबईकरांनी पावसाळ्यात सुरक्षिततेचा विशेष जतन करावा. घराजवळ राहणे, गरज नसल्यास बाहेर न पडणे, आणि पाण्याने भरलेल्या भागातून वाहन न घेणे या टिप्स पाळल्यास आपत्कालीन परिस्थिती टाळता येईल. प्रशासन व पोलीस प्रशासन आपल्या सोबत आहेत, परंतु नागरिकांची जबाबदारी देखील महत्त्वाची आहे. मुंबईवरील मुसळधार पावसामुळे जीवनमान प्रभावित झालेलं असलं तरी प्रशासन व हवामान विभागाच्या सतर्कतेमुळे नागरिक सुरक्षित राहू शकतात.