नागपूर : निसर्गाने विदर्भाला भरभरून दिले. इथल्या जमिनीत कोळशापासून ते मँगनीजपर्यंत मोठी खनिजसंपत्ती आढळते. मात्र आता याच जमिनीत सोन्याचा साठाही दडल्याचा दावा जीएसआय अर्थात भुवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडियाने केला आहे. विदर्भाच्या जमिनीत काय दडलंय याचा शोध लावलाय. सोन्याचे हे गूढ नक्की आहे तरी काय? खरंच विदर्भाच्या जमिनीत खजिना दडलाय का? तर याचे उत्तर होय असे आहे. चंद्रपूरला सोन्याच्या खाणी असल्याची चर्चा होतीच, पण नागपूर जिल्ह्यातही मुबलक प्रमाणात सोन्याचे साठे असल्याचा अंदाज भूगर्भ सर्वेक्षण विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम ब्लॉकमध्ये परसोडीच्या परिसरात सोन्याचे मुबलक साठे असल्याचे जीएसआयने नमूद केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अमरावती शहराला ८ तारखेपर्यंत पाणी पुरवठा नाही; कारण…

यापूर्वीही जीएसआयचा हा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार, जीएसआयने नागपूर विभागात इतर मौल्यवान धातूंचे साठे असल्याचे अहवालात नमूद केले होते. यापैकी परसाेडीच्याच परिसरात तांब्याचेही साठे आहेत. यासह कुही, खोबना परिसरात मोठ्या प्रमाणात टंगस्टनचे साठे असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्यातच रानबोरी, भावनेरी भागात झिंक धातूचे साठे आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली बेल्टमध्ये निकेल, कोबाल्ट, क्रोमाइट, प्लॅटिनम या गटातील धातूंचे मुबलक साठे आहेत. भारतच नाही, तर आशिया खंडात अशा प्रकारच्या धातूचे साठे असल्याचे हे एकमेव उदाहरण आहे. देशात बस्तर खोरे हे मौल्यवान धातूंसाठी प्रसिद्ध आहे. विदर्भाचा गडचिरोली, भंडारा व नागपूरचाही प्रदेश या खोऱ्यात येतो. त्यामुळे जीएसआयने सर्वेक्षण केलेल्या साइटवर पुन्हा सर्वेक्षण करून, खोदकाम करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. भिवापूरच्या परसोडी, किटाळी, मरुपार ब्लॉकमध्ये सोन्याचे साठे. परसोडी भागातच तांब्याच्या खाणी. कुही, खाेबना या भागात टंगस्टनचे साठे. रानबोरी, भावनेरी भागात झिंकच्या खाणी आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Officials of geological survey of india claim gold mine in vidarbha land zws
First published on: 05-12-2022 at 11:40 IST