अमरावती : गेल्‍या वर्षी माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्‍यानंतर चर्चेत आलेल्‍या खासदार नवनीत राणा यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त येत्‍या ६ एप्रिलला अमरावतीत सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला असून त्‍या निमित्‍ताने शहरातील विविध भागात झळकलेल्‍या पोस्‍टर्सवर नवनीत राणा यांचा उल्‍लेख “हिंदू शेरणी” असा करण्‍यात आला आहे.

हनुमान चॅरिटेबल ट्रस्‍टच्‍यावतीने बडनेरा मार्गावरील वीर हनुमानजी खंडेलवाल लॉन येथे हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. विशेष म्‍हणजे, पठणात सहभागी होणाऱ्या भक्‍तांना चांदीचा शिक्‍का आणि हनुमान चालिसा पुस्तिका भेट म्‍हणून देण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने शहरातील विविध भागात झळकलेल्‍या पोस्‍टर्सवर नवनीत राणा यांचा उल्‍लेख “हिंदू शेरणी” असा करण्‍यात आल्‍याने त्‍याची चर्चा आता रंगली आहे.

हेही वाचा… वर्धा: पाळण्याची दोरी नव्हेतर हाती आता ‘ स्टिअरिंग व्हील ‘; वाहनचालक पदासाठी आता युवतीही सरसावल्या

हेही वाचा… चंद्रपूर: हजारावर पंचनाम्यामध्ये फेरबदल, पीक विमा कंपनीचे पितळ उघड; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमाच्‍या निमंत्रण पत्रिकेवरदेखील उद्धव ठाकरे यांच्‍यावर टीका करण्‍यात आली आहे. हनुमान चालिसा पठण करण्‍यास उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्‍पत्‍याला मनाई केली. अहंकाराने आपल्‍या पदाचा गैरवापर करून खोटे गुन्‍हे दाखल केले आणि १४ दिवस तुरूंगात टाकले. तरीही राणा दाम्‍पत्‍य खचले नाही. तुरूंगातून सुटका झाल्‍यानंतर न डगमगता नव्‍या ऊर्जेने आणि आणखी प्रखरतेने धर्मरक्षणासाठी मैदानात उतरले. हनुमान चालिसाचा विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना श्राप लागला आणि त्यांचा पक्ष गेला, पक्षचिन्‍ह गेले. मुख्‍यमंत्रीपद गेले आणि सरकारसुद्धा कोसळले. “जो प्रभू श्रीराम का नही, जो श्री हनुमान का नही, वो किसी काम का नही”, हे वचन सिद्ध झाले, असे निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्‍यात आले आहे. त्‍याचीही चर्चा शहरात रंगली आहे.