scorecardresearch

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

अष्टभुजा जंगल परिसरात लाकूड ताेडण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज, रविवारी सकाळी उघडकीस आली.

tiger attack
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

चंद्रपूर : अष्टभुजा जंगल परिसरात लाकूड ताेडण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज, रविवारी सकाळी उघडकीस आली. भजन बारई असे मृताचे नाव आहे. भजन बारई शनिवारी लाकूड ताेडण्यासाठी जंगलात गेले होते. ते सायंकाळ झाल्यानंतरही घरी परतले नाही. त्यामुळे त्यांचा जंगल परिसरात शोधाशोध केली असता, एक पाय तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, रविवारी सकाळी त्यांचे शिर आढळून आले. वाघाने त्यांच्या शरीराचे लचके तोडले होते त्यामुळे चेहरा विद्रुप झाला होता. वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी कारेकर यांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 18:31 IST

संबंधित बातम्या