नागपूर : सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांनी ‘एचपीव्ही’ लस तयार केली आहे. काटोल-नरखेडच्या एक हजार मुलींना नागपूर येथील विवेका हॉस्पिटलमध्ये लस देण्यात आली. स्वास्थ्य वृक्ष फाऊंडेशन व विवेका हॉस्पिटलच्या माध्यमातून ही लस मोफत देण्यात आली हे विशेष.

आदित्य ब्रिरला ग्रुपनेसुद्धा मदत केली. यासाठी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी प्रयत्न केले. साधारणत: ९ ते २० वयोगटाती मुली ही लस घेण्यासाठी पात्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ही लस ग्रामीण भागातील मुलींना मोफत उपलब्ध करून देण्यात आली.

हेही वाचा – मध्य रेल्वेच्या ९ ते २३ ऑगस्टदरम्यान वेगवेगळ्या तारखांना १९ गाड्या रद्द; वाचा कारण काय ते….

हेही वाचा – मध्य रेल्वेच्या ९ ते २३ ऑगस्टदरम्यान वेगवेगळ्या तारखांना १९ गाड्या रद्द; वाचा कारण काय ते….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गर्भाशयाच्या कर्करोगासोबत ही लस मुख, घसा, मेंदू आणि मानेच्या कर्करोगालासुद्धा प्रतिबंध करू शकते. पुण्याच्या प्रसिद्ध सिरम इन्स्टिट्यूटने ही लस विकसित केली असून बाजारात याची किंमत सहा हजार रुपये आहे. गर्भाशयाच्या कर्करोगासह इतर कर्करोग रोखण्याचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामीण भागातील एक हजार मुलींना ही लस देण्यात आली.