नागपूर : चीनसह जगातील काही देशात करोनाने डोके वर काढले असतानाच नागपूर मात्र करोनामुक्तीच्या मार्गावर असल्याचे सुखद चित्र आहे. जिल्ह्यातील शहरी भागात सध्या केवळ १ सक्रिय रुग्ण असून नवीन रुग्ण आढळत नसल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर विमानतळावर चाचणी सुरू आहे. मध्यंतरी विदेशातून आलेल्या तरुणामध्ये करोनाचे निदान झाल्याने चिंता वाढली होती. परंतु त्यानंतर शहरात सातत्याने रुग्ण कमी होऊन सध्या शहरी भागात केवळ एकच सौम्य लक्षणाचा रुग्ण आहे. दरम्यान, शहरात आजपर्यंत करोनाचे ४ लाख ५ हजार ८६२ रुग्ण, ग्रामीणला १ लाख ७१ हजार ५५५, जिल्ह्याबाहेरील ९ हजार ९९६ असे एकूण ५ लाख ८७ हजार ४१३ रुग्ण आढळले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only one active patient in the city on the way to free corona city nagpur mnb 82 ysh
First published on: 15-01-2023 at 11:18 IST