scorecardresearch

Premium

ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध, माळी महासंघाची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास माळी महासंघाचा विरोध असून या विरोधात १७ सप्टेंबर पासून माळी महासंघ राज्यभर ठिय्या आंदोलन करणार आहे.

mali maha sangh
ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध, माळी महासंघाची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

नागपूर : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास माळी महासंघाचा विरोध असून या विरोधात १७ सप्टेंबर पासून माळी महासंघ राज्यभर ठिय्या आंदोलन करणार आहे.माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी ही माहिती दिली. निजाम कालीन कुणबी जातीचे दाखले देण्याचा सरकारी आदेश रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. मराठा आंदोलनाच्या दबावात येऊन सरकारने मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास व ओबीसी मधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तो ओबीसीवर अन्याय होईल.मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही .त्यांना खुल्या गटातून आरक्षण मिळत आहे. तेच वाढवून द्यावे किंवा आवश्यक वाटल्यास घटनादुरुस्ती करून त्यांना ओबीसी कॅटेगिरी वगळून स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावे, असेही ठाकरे म्हणाले.

शासनाने कोणत्याही परिस्थितीत मराठा जातीचे ओबीसीकरण करू नये. त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये आणि राज्य पातळीवर बिहार राज्याच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा असेही ठाकरे म्हणाले.

Bihar special status
पक्षाला जनतेत पोहोचवण्यासाठी नितीश कुमारांची धडपड; एनडीएप्रवेशानंतरही बिहारसाठी ‘विशेष दर्जा’ची मागणी
Maratha reservation
मराठा आरक्षणाचा राजकीय फायदा होणार का ?
farmers march on new delhi for law for minimum support price of crops
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी व्यूहरचना; किमान आधारभूत किंमतीसाठी कायदा करण्याची मागणी
Eknath Shinde Abhishek Ghosalkar
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Opposition to giving reservation to maratha community through obc quota vmb 67 amy

First published on: 12-09-2023 at 18:21 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×