वर्धा : राज्यातील विद्यार्थी संख्या किती? याचा तपशील शाळा निहाय पटसंख्या मोजून ठरतो. तशी आकडेवारी शिक्षण विभागाकडे उपलब्ध असते. मात्र अधिकृत ३ लाख ६५ हजार ७७८ विद्यार्थी असून, त्यापैकी १ लाख २१ हजार ९९७ विद्यार्थीच वैध असल्याचे शिक्षण विभागाच्या संकेतस्थळाने नमूद केले. नेमके काय तर ही अधिकृत संख्या आधार सलग्न विद्यार्थ्यांची आहे. मंगळवारी दिवसभर अशी तपासणी झाली.

हेही वाचा – कर्नाटक निवडणूक : प्रचारासाठी फक्त गडकरी व फडणवीसच पात्र, महाराष्ट्रातील बाकीच्यांचे काय?

आधार असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व तत्सम लाभ देण्याचे धोरण आहे. त्यामुळे आधार संलग्न नसणारे विद्यार्थी अपात्र ठरल्याने गोंधळ उडतो. त्यासाठी अवैध ठरलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे इ आधार कार्ड प्रणालीत करणे आवश्यक ठरते. त्यानंतर स्टुडंट पोर्टलवर ते अद्यावत करणे भाग आहे. पोर्टलवर सुरक्षित व अद्यावत केल्यानंतरच विद्यार्थी वैध ठरण्याचे प्रमाण वाढेल, असे मत एका शिक्षक नेत्याने व्यक्त केले. ही प्रक्रिया किचकट ठरू नये म्हणून उपाय व्हावे, अन्यथा अवैध विद्यार्थी लाभ वंचित ठरतील. त्याचा त्रास मुख्याध्यापकांना होणार.