लोकसत्ता टीम
गोंदिया: सालेकसा तालुक्यातील आमगाव सालेकसा मार्गावर एका क्रेनने पाणीपुरी विक्रेत्याला धडक दिली. या घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. जागेश्वर विठोबा उईके वय ३३ वर्ष रा.कुणबीटोला ता. सालेकसा जिल्हा गोंदिया असे मृतकाचे नाव आहे.
आणखी वाचा-चंद्रपूर : पोलीस हवालदाराची आत्महत्या
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सालेकसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागेश्वरला क्रेन धडक दिली. या धडकेत त्याचा मृत्यू झाला. जागेश्वर हा आई-वडिलाना एकुलता एक मुलगा होता. पुढील कारवाई सालेकसाचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद राऊत यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.