लोकसत्ता टीम

नागपूर: पावसाळापूर्व करावयाच्या कामाचा एक भाग म्हणून रस्त्यालगत असलेल्या झाडांच्या फांद्याची कापणी केली जाते. मात्र त्याचा कचरा वेळीच उचलला जात नसल्याने त्याचा त्रास परिसरात राहणाऱ्या लोकांना व रस्त्यावरून जाणाऱ्यांना नागरिकांना सहन करावा लागतो.

दक्षिण नागपूर प्रभाग ३४ मानेवाडा रिंगरोड वरील मानेवाड चौक ते तुकडोजी पुतळा चौक या दरम्यान रस्त्यालगत दोन्हीही बाजूच्या झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या. फांद्याचा ढिग तयार करून त्याच झाडाखाली ठेवण्यात आला.तो अद्याप उचलला नाही. याचा फटका रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना व वाहन चालकांना बसत आहे. यामुळे अपघातही होऊ शकतो, अशी तक्रार या भागातील नागरिकांची आहे.

हेही वाचा… अमरावतीच्या युवकांची शरद पवारांना धमकी, मात्र २०११ मध्ये ते कृषिमंत्री पदावर असताना दिल्लीत नेमके काय घडले होते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम झाल्यानंतर कचरा तातडीने उचलणे अपेक्षित आहे. मानेवाडा रिंगरोडच नव्हे तर शहराच्या इतरही भागात अशीच स्थिती आहे. वादळामुळे किंवा तत्सम कारणामुळे रस्त्यावर पडलेली झाडे तत्काळ बाजूला केली जातात, मात्र नंतर ती रस्त्याच्या बाजूलाच अनेक दिवस पडलेली असतात. वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिका जी तत्परता दाखवते तिच तत्परता त्यांनी झाडे उचलण्यासाठीही दाखवावी,अशी मागणी नागरिकांची आहे.