नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाचे लोकार्पण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज करण्यात आले.
केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशनअंतर्गत दक्षिण- पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इतवारी स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम अडीच वर्षांत पूर्ण झाले आहे. नागपुरी संत्र्यांची ओळख, आदिवासी संस्कृतीला रेल्वे स्थानकाच्या प्रथमदर्शनी भागात प्रदर्शित करण्यात आले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील काचेची कलाकृती आकर्षणचे केंद्र ठरली आहे. इतवारी स्थानकाचा कायापालट करण्यासाठी १२ कोटी ३९ लाख रुपये खर्च आला.
कला, संस्कृती
नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात आल्यामुळे इतवारी स्थानकाचे महत्त्व वाढले आहे. स्थानकाच्या प्रवेश मार्गावर आदिवासी संस्कृती आणि ऐतिहासिक मारबत महोत्सवालाही स्थान देण्यात आले आहे. याशिवाय अन्य कलाकृतीही लक्ष वेधून घेत आहेत.
इतवारी स्थानकावरून दररोज शेकडो प्रवासी ये-जा करतात. मात्र, त्या तुलनेत स्थानक लहान होते. तसेच प्रवाशांना आवश्यक असणान्या सुविधाही अपुऱ्या होत्या. प्रवासी सुविधा वाढविण्यासोबतच स्थानकाच्या मुख्य इमारतीत कला, संस्कृतीला विशेष स्थान दिले गेले आहे. सर्क्युलेटिंग एरिया, उद्यान, ( पार्किंग, हायमास्ट लाईट, आ कॉनकोर्सचा विकास, चित्रकारी, स्थानिक कलाकृती, आकर्षक पोर्च, भुवनेश्वर मॉडेलच्या धरतीवर शौचालय, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, प्रशस्त प्रतीक्षालय, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधाही करण्यात आली आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे स्थानकाचे निर्माण करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींच्या हस्ते नामकरण
दोन वर्षांपूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते इतवारी रेल्वे स्थानकाचे नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात आले होते.
प्रवेश-निर्गमन दरवाजे, रुंद रस्ते, दुचाकी पार्किंग आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्था आहे.
स्थानक परिसर आता आधुनिक तिकीट काउंटर, सुसज्ज प्रतीक्षा कक्ष, दिव्यांग व्यक्तींसाठी समर्पित सुविधा, जनऔषधी केंद्र आणि रेल्वे कोच रेस्टॉरंट आहे.
रंगरंगोटी स्टेशनच्या बाहेरील भागात पारंपारिक आणि आधुनिक वास्तुकलेचे सुंदर मिश्रण आहे. स्थानिक गोंड कला, चित्रकला आणि हस्तकला उद्योगाच्या कलाकृतींनी सजवलेले आहेत. या विशेष आकर्षणांमध्ये नागपुरातील प्रसिद्ध नारंगी काचेच्या कलाकृती आहे.