नागपूर: देशात झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे बावचळले आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते खासदार संजय सिंह यांनी केला. वर्धा येथील इंडिया आघाडीच्या लोकसभा उमेदवाराच्या प्रचार सभेसाठी आले असता त्यांनी विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गद्दारांना कधीही माफ केले नाही तशी महाराष्ट्राची जनताही येथील गद्दारांना कधीच माफ करणार नाही. शरद पवारांची घडी आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष चोरला आहे. यामागे भाजपची शक्ती होती. याचे उत्तर जनता निवडणुकीमध्ये मागणार आहे. देशात पहिल्या टप्यात झालेल्या निवडणुकांनंतर पंतप्रधान मोदींना त्यांचा पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आहे. त्यामुळे मोदी बावचळल्याचा आरोपही सिंह यांनी केला. काँग्रेस सत्तेत आली तर जनतेचा पैसा जास्त मुले असणाऱ्यांना वाटून टाकेल, असा आरोप मोदींनी राजस्थान येथील सभेतून केला होता. यावरील प्रश्नावर सिंह म्हणाले की, या देशात सर्वात जास्त लोकसंख्या ही हिंदूंची आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली तर ती हिंदूंचीच वाढेल. पेपरफुटी झाली तर हिंदू तरुणांचे सर्वाधिक नुकसान होईल. शेतकरी, महिला, व्यावसायिक सर्वाधिक हिंदूच आहेत. त्यामुळे मोदी लोकांना मुर्ख बनवण्याचे काम करत असल्याचा आरोपही केला.

हेही वाचा – नागपुरात उन्हाळ्यात पाऊस, ‘हे’ आजार वाढण्याचा धोका..

हेही वाचा – तृतीतपंथयांची मते २४ तासात ३२ वरून २८ वर, उमेदवाराला दिलेल्या आकडेवारीत तफावत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागा

सिंह म्हणाले की, भाजपने लोकशाहीची हत्या केली असून संविधान बदलण्याची योजना आखली आहे. भविष्यात निवडणुकाच होणार नसल्याने आज हे सर्वात मोठे आव्हान आहे. तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपचे आरोप लावण्याच्या प्रश्नावर सिंह म्हणाले की, जे राज्य वर्षभरातून जळत आहे अशा मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आधी मागायला हवा.