यवतमाळ: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी करणार्‍या अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तब्बल ११ लाख ३० हजार रुपये किमतीच्या २३ दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई गुरुवारी यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाने केली.

सुभाष गौतम मस्के (५०, रा. वायगाव निपाणी, जि. वर्धा), असे अट्टल दुचाकी चोरट्याचे नाव आहे. मागील वर्षभरापासून वैद्यकीय महाविद्यालयातून सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. जवळपास दीड महिन्यापासून डीबी पथकाने सापळा रचला. गुरुवारी एक संशयित दुचाकी चोरी करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरताना दिसून आला. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांबद्दल विचारणा केली असता, टोलवाटोलवीची उत्तरे दिले. त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. तेव्हा त्याने वैद्यकीय महाविद्यालयासह शहरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

हेही वाचा… सुधारित पैसेवारीमध्ये संभाव्य दुष्काळाचे प्रतिबिंब! जिल्ह्याची पैसेवारी ५५; पिकांची स्थितीही बिकट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्धा जिल्ह्यातील निपाणी येथील घरून ११ लाख ३० हजार रुपये किमतीच्या २३ दुचाकी जप्त करण्यात आल्या. सुभाष मस्के हा दुचाकी चोरी केल्यावर निपाणी गावी घेऊन जायचा. नंबर प्लेटवरील नंबर बदलून टाकायचा. बनावट चाबी लावून दुचाकी चोरी करायचा. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ संजय पुजलवार, पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, ठाणेदार सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संजय आत्राम, सपोनि प्रकाश पाटील, पोलिस उपनिरीक्षक राहुल गुहे, अन्सार बेग, प्रदीप नाईकवाडे, रावसाहेब शेंडे, किरण पडघन, अश्‍विन पवार, मिलिंद कांबळे, समाधान कांबळे, गौरव ठाकरे, रवी नेवारे, अंकुश फेंडर, गौतम मनवर, मलनस आदींनी केली.