बुलढाणा: जिल्ह्यातील दोन वाटमारी (रोड रॉबरी) च्या घटनांचा तपास ४८ तासातच लावण्यात पोलीस विभागाला यश आले आहे. किनगाव राजा मधील दरोड्याचे ‘मराठवाडा कनेक्शन’ असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सहा सदस्यीय टोळीतील महिला ‘रेकी’ करायची तर नांदुऱ्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार मालवीय व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी आज दुपारी आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिली. मागील १८ व १९ ऑक्टोबरला अनुक्रमे नांदुरा व किनगावराजा ( ता सिंदखेडराजा) येथे डोळ्यात मिरपूड टाकून दोघा वसुली प्रतिनिधीची लूटमार करण्यात आली. किनगावराजा प्रकरणात वसुली प्रतिनिधी ची दुचाकी अडवून व डोळ्यात मिरपूड टाकून टोळीने ४ लाख ४३ हजार रुपयांची रक्कम लंपास केली होती. नांदुरा येथे मालवाहू वाहनाने जाणाऱ्या प्रतिनिधीला अडवून ३.७८ लाखांची रक्कम दोघांनी हिसकावून पळ काढला होता, अशी माहिती मालवीय यांनी दिली.

हेही वाचा… वाचन संस्कृती टिकविण्यासाठी ‘सेल्फी विथ अ बुक,’ घाटंजी येथील प्राध्यापकांच्या पुढाकाराने वाचन चळवळीला बळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा मिळून सहा पथके गठीत करण्यात आली. या पथकांनी अल्पावधीत तपास करीत आठ आरोपींना अटक करून साडेसहा लाखांचा मुद्धेमाल जप्त केला. किनगाव मधील घटनेत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील पाच जण संभाजीनगर मधील रहिवासी आहे.यात एका महिलेचा समावेश असून ती संबधित व्यापार प्रतिनिधीचे ‘लोकेशन’ प्रत्यक्ष लूटमार करणाऱ्या सदस्यांना देत होती अशी धक्कादायक माहिती अशोक लांडे यांनी दिली.