नागपूर: प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. जुबेर रफीक शेख (२५) रा. खरबी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
आरोपी जुबेर आणि पीडित २० वर्षीय तरुणी एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. मे २०२३ मध्ये जुबेर याने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. लग्नाचे आमिष दाखवून घरी आणि वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घेऊन जात मुलीचे लैंगिक शोषण सुरू केले.
हेही वाचा… मौजमजेसाठी चोरी! अल्पवयीन मुलांकडून अकरा दुचाकी जप्त
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मुलीने लग्नासाठी दबाव टाकला असता जुबेरने स्पष्ट नकार दिला. तरुणीने त्याच्यापासून दुरावा केला. त्यानंतरही तो तरुणीवर त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. शेवटी कंटाळून तरुणीने बुधवारी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून जुबेरला अटक केली.