वर्धा : मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोन दुचाकीस्वारांना धडक देऊन जखमी करणाऱ्या पोलीस अंमलदार पूजा गिरडकर आणि मनोज सूर्यवंशी यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.

२२ फेब्रुवारीला महिला पोलीस अंमलदार पूजा गिरडकर हिने दारूच्या नशेत वेगणआर कार चालवायला घेतली. वाहन भारधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत दुचाकीने जाणाऱ्या दोघांना धडक दिली. त्यात दोघे जखमी झाले. त्यांनी पोलिसांना जाब विचारल्यावर धुंद असणाऱ्या महिलेने वाद घातला होता. तसेच गाडीच्या मागील सिटवर अंमलदार मनोज हा दारूच्या नशेत झोपून असल्याचे उपस्थित नागरिकांना दिसून आले. त्याचे काहींनी चित्रीकरण करीत व्हिडीओ व्हायरल केला.

हेही वाचा – सेल्फीस नकार देत पालकाने मुख्यमंत्र्यांना केला थेट सवाल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

हेही वाचा – तब्बल दीड हजार दिवसांचा उशीर! ग्राहक आयोगाने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना…

या अपघाताची रामनगर पोलिसांत तक्रार झाली होती. समाज माध्यमावर ही घटना चांगलीच चर्चेत आली होती. त्याची चौकशी सुरू झाली. त्याचा अहवाल सोमवारी आला. त्यात दोन्ही अंमलदार दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दोघांनाही निलंबित करण्यात आले.